मुंबई

vaccine : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच करोना लसीचा ‘ड्राय रन’ जाणून घ्या तारीख

टीम लय भारी

मुंबई : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अवघा देश सज्ज झाला आहे. अशात नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचा (vaccine) ड्रायरन म्हणजेच रंगीत तालिम होणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ही माहिती दिली आहे. डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने आत्तापर्यंत ८३ कोटी सीरिंज खरेदी केल्या आहेत. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लसीकरणाचा ड्राय रन पार पडणार आहे. २ जानेवारीला लसीकरणाची रंगीत तालिम केली जाणार आहे असंही सोमानी यांनी सांगितलं. देशातील सर्व राज्यांमध्ये हा ड्राय रन पार पडणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
२०२० या वर्षाच्या सुरुवातीला करोनाचा शिरकाव भारतात झाला. मार्च महिन्यापासून महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाउन करण्यात आला. करोना सारख्या संसर्गजन्य आजारावर लस शोधण्याचं कामही सुरु झालं. आता २०२१ च्या स्वागताची तयारी अवघा देश करत असताना मोदी सरकारने नव्या वर्षात लसीकरणाचा ड्राय रन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातल्या सर्व राज्यांमध्ये २ जानेवारीला हा ड्राय रन पार पडणार आहे.

पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये आत्तापर्यंत ड्राय रन पार पडला आहे. त्याचे चांगले परिणामही समोर आले आहेत. ज्यानंतर आता केंद्र सरकारने २ जानेवारी रोजी सर्व राज्यांमध्ये करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचा ड्राय रन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

काय म्हणाले एम्सचे रणदीप गुलेरिया?

भारतात करोना लसीचा ड्राय रन पार पडतो आहे ही अत्यंत चांगली बाब आहे असं एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. भारताच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

13 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

13 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

14 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

16 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

17 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

17 hours ago