मुंबई

पाणी प्रश्न पुन्हा पेटणार? मुंबई, ठाण्यात 31 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत मोठी पाणीकपात!

मुंबईकरांचे कोट्यवधी लिटर पाणी ठाण्यातील गटारीत वाहून जात आहे. वागळे इस्टेट परिसरात रोज दहा दशलक्ष म्हणजे एक कोटी लिटर पाणी वाया जात आहे. नोव्हेंबर 2022 पासून ही गळती सुरू आहे. दुसरीकडे मुंबईला मात्र रोज पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे, याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी माहिती देत वृत्ताला दुजोरा दिला. त्यामुळे राज्यात पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटणार आहे. मुंबईतील हजारो लिटर पाणी वाया जात असून नागरिकांना यावेळी मोठ्या पाणीकपातीस सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रणाने सर्व लोकांना पुढील काही दिवस किमान पाणी वापरण्याचे आवाहन नागरी अधिकाऱ्यांनी केले आहे.

ठाण्यातील जलबोगद्याला गळती लागल्याने सुमारे पाच महिन्यांपासून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होते. अखेर बीएमसीने ही बाब लक्षात येताच ही गळती दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 31 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत मुंबईत 15 टक्के पाणीकपात होणार आहे. बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या बोगद्याला ठाण्यात बोअरवेल खोदताना गळती लागली आहे. या लिकेजच्या दुरुस्तीचे काम 31 मार्चपासून सुरू होणार असून, ते पुढील 30 दिवस सुरू राहणार असल्याने या कालावधीत मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरात 15 टक्के पाणीकपात होणार आहे. यासोबतच ठाणे शहरातही ही वजावट लागू होणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांना पुरवल्या जाणाऱ्या एकूण पाण्यापैकी सुमारे 65 टक्के पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केली जाते, असे बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. या प्लांटला 75 टक्के पाणीपुरवठा हा 5,500 मिमी व्यासाच्या 15 किमी लांबीच्या पाण्याच्या बोगद्याद्वारे होतो. ठाण्यात बोअरवेल खोदल्यामुळे हा जलबोगदा खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. पाण्याची गळती दुरुस्त करण्यासाठी पाण्याचा बोगदा पूर्णपणे बंद करणे आवश्यक असून, यादरम्यान हे पाणी पर्यायी वाहिन्यांद्वारे भांडुप जलशुद्धीकरण केंद्राकडे वळवले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा :

ठाणेकरांनी पळविले मुंबईचे पाणी; वागळे इस्टेट बोगदा कांड : जितेंद्र आव्हाड

राज्यातील पाणी योजनांना आता इलेक्ट्रोक्लोरिनेशनची साथ

सकाळी रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिल्याने होतात अनेक फायदे ! जाणून घ्या एका क्लिकवर

Team Lay Bhari

Recent Posts

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

10 mins ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

1 hour ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

2 hours ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

2 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

2 hours ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

3 hours ago