मुंबई

ठाण्यातील ‘हा’ देखणा घुमट कोणी बनविला ? जाणून घ्या वैशिष्ट्ये

ऐतिहासिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाणे शहराची ओळख तलावांचे शहर अशीही आहे. अशा या शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे महापालिकेने दी स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रूवमेंट स्कीम अर्थात सॅटिस( SATIS) ची निर्मिती केली. 35 कोटी 50 लाख खर्च आलेल्या या प्रकल्पाचे 2010 मध्ये लोकार्पण करण्यात आले. पण ऊन आणि पावसाळ्यात सॅटिसवर बसेसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची चांगलीच कोंडी होत असे. तेव्हा ठाण्यातील एका आमदाराने आपल्या विकास निधीतील 15 लाख रुपये ठाणे महापालिकेला दिले आणि हा डोम तयार करण्यात आला. त्यामुळे आता सॅटिसवर बसेसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांचे उन-पावसापासून संरक्षण होत आहे. The Station Area Traffic Improvement Scheme SATIS

2010 पर्यंत ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहनांना शिरणे जिकिरीचे होते. कुठेही, कशाही उभ्या केलेल्या रिक्षा,  फेरीवाल्याचे अतिक्रमण त्याने अरुंद झालेला रस्ता त्यातून प्रवाशांना मोठ्या दिव्यातून वाट काढावी लागायची. ठाण्यातील ही मुख्य अडचण लक्षात घेऊन तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी सरकारच्या ही बाब निदर्शनास आणली. त्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ठाणे महापालिका यांच्या एकत्रित प्रयत्नातून सॅटिसची निर्मिती झाली. या प्रकल्पात वरच्या बाजूला एक डेक आहे. त्यातून टीएमटीच्या बसेस सुटतात. दक्षिण आणि उत्तरेकडे दोन स्कायवॉक आहेत. तसेच फूटओवर ब्रिजेस आहेत. या प्रकल्पामुळे ठाणे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सुटली आहे.

हे सुद्धा वाचा 
ड्रीम गर्ल 2 ला तरुणाई भुलली; तीन दिवसांत कमावले 40 कोटी
Exclusive: दांडग्या मलईदार पदावर ‘विद्वान’ अधिकाऱ्याची नियुक्ती!
डिंपल क्वीन प्रीती झिंटानं जवळच्या व्यक्तीला गमावलं… इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट

2010 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होऊन सॅटिसवर छत नव्हते. त्यामुळे उना-पावसात प्रवाशांना आसरा घेऊन ताटकळत रहावे लागत असे. याबाबत प्रवाशांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या. पण या अजस्त्र सॅटिसवर मोठे छत पाहिजे होते. त्याचा एकूण खर्च पाहता ठाणे महापालिका या छतासाठी दानशूर व्यक्तीची वाट पाहत होती. तेव्हाचे ठाणे महानगरपालिका नगर अभियंता के. डी. लाला यांनी ही अडचण विधान परिषदेचे उपसभापती तसेच ठाण्याचे माजी महापौर वसंत डावखरे यांच्या निदर्शनास आणली. हे छत उभारण्यासाठी 15 लाखांचा खर्च असल्याचे लाला यांनी डावखरे यांना सांगितले. ठाणेकर प्रवाशांची अडचण ओळखून डावखरे यांनी आपल्या आमदार निधीतून 15 लाख रुपये सॅटिसवरील डोमसाठी उपलब्ध करून दिले.

2012 मध्ये हा डोम लावण्यात आल्यानंतर आता उन आणि पावसापासून प्रवाशांचे संरक्षण होत आहे. शिवाय एकेकाळी ठाणे रेल्वे स्थानकात शिरणे कठीण जायचे. पण आता या परिसरातील वाहतुकीला शिस्त लागली आहे. वसंत डावखरे यांनी डोमसाठी आपला विकास निधी दिला नसता तर आजही कदाचित प्रवाशांना उन-पावसात बसेसची वाट पहावी लागली असती. पण डावखरे यांच्या निधीमुळे सॅटिसला डोम मिळाले आहे. या डोममुळे विहंगम
दृश्यातून सॅटिसला वेगळी झळाळी प्राप्त झाली आहे.

विवेक कांबळे

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

5 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago