30 C
Mumbai
Monday, August 28, 2023
घरमनोरंजनडिंपल क्वीन प्रीती झिंटानं जवळच्या व्यक्तीला गमावलं... इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट

डिंपल क्वीन प्रीती झिंटानं जवळच्या व्यक्तीला गमावलं… इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट

नेत्वा धुरी, मुंबई :  बॉलीवूडची डिंपल क्वीन प्रीती झिंटाच्या सासर्‍यांचं नुकतंच निधन झालं . सासरे गमावल्याने भावुक झालेल्या प्रीती झिंटाने सासर्‍यांच्या आठवणीत इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली. तुमची आठवण येते, असं सांगत प्रीतीने सासऱ्यांसोबत घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला. प्रीतीने 29 जानेवारी 2016 रोजी अमेरिकेत स्थायिक जेड गुडइनफसोबत लग्न केलं. लग्नानंतर प्रीतीही अमेरिकेलाच राहायला गेली. 90 च्या काळात ‘बोल्ड अँड ब्युटीफूल’ प्रीती झिंटाने दर्जेदार सिनेमात काम केले.

‘संघर्ष’, ‘कल हो ना हो’, ‘मिशन कश्मीर’, ‘ कोई मिल गया’,’ हर दिल जो प्यार करेगा’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या या चित्रपटातील प्रीती झिंटाचा बहारदार अभिनय प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहिला. प्रीती झिंटाने अभिनेता सलमान खान आणि हृतिक रोशन यांच्यासोबत सर्वात जास्त काम केले.

‘चोरी चोरी चुपके चुपके’ चित्रपटात प्रीती झिंटासोबत अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. शरीर विक्री करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्रीती झिंटा चपलख बसली. सिनेमाच्या निर्मितीत काळा पैसा गुंतल्याचं सिद्ध होताच एकट्या प्रीती झिंटाने न्यायालयात खरी माहिती दिली. प्रितीच्या धाडसी स्वभावाचा कौतुकही झालं. प्रीतीला ‘बॉलीवूडचा हिरो’ असं नाव मिळालं.

2005 नंतर प्रीतीचे फारसे सिनेमे चाललेच नाहीत
अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासोबत ‘वीर-झारा’ या चित्रपटात प्रीतीच जास्त भाव खाऊन गेली. अभिनेता सैफ अली खान सोबतच्या ‘सलाम नमस्ते’ चित्रपटानंतर प्रीतीची ‘बोल्ड एन्ड ब्युटीफूल’ अशी इमेज तयार झाली. मात्र त्यानंतर प्रीतीचे फारसे चित्रपट चाललेच नाही. प्रीतीचे नेसवाडिया सोबत प्रेमसंबंधही संपुष्टात आले. अखेरीस 2016 साली प्रीती जेड गुडइनफसोबत संसार थाटत थेट अमेरिकेत स्थायिक झाली. प्रीतीने सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचं मातृत्वही स्वीकारलं. प्रीती अधूनमधून कामानिमित्ताने भारतात येत असते.

हे सुद्धा वाचा 
सनी पाजीच्या गदर २ ने अक्षय कुमारचा ओएमजी २, रजनीकांतच्या जेलरला मागे टाकत कमावले इतके कोटी!
Happy Birthday Sameera Reddy | आता मनोरंजन विश्वापासून दूर राहतेय समीरा रेड्डी!
PHOTO : सिनेमांपेक्षा इंस्टाग्रामवरून जास्त पैसे कमावते जान्हवी कपूर, वाचा गणित

प्रीती म्हणाली, डियर जॉन…

शूटिंगकाळात बरेचदा प्रीती सासऱ्यांना सोबत घेऊन यायची. सासऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्यांचा ‘डियर जॉन’ असा उल्लेख करत इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली. प्रीती म्हणाली की,’ डियर जॉन, मी तुमचा आपलेपणा, प्रेम आणि तर्कसबुद्धी सर्वात जास्त मिस करते. तुमच्यासोबत शूटिंगला जायला, तुमचे आवडते भारतीय खाद्यपदार्थ बनवायला मला फार आवडायचं. तुमच्यासोबत कोणत्याही विषयावर सहज बोलता यायचं. माझ्यासाठी तुम्ही घरात आणि मनात आत्मीयतेने स्वागत केलं. माझ्यासाठी आता हा पूर्व किनारा माझ्यासाठी अगोदरसारखा राहिला नाही. तुम्ही आता सुखी आणि आनंदी आहात, याची मला कल्पना आहे. तुमच्या आत्म्याला शांती मिळो.’, अशी मोठी पोस्ट प्रीतीनं लिहिली. प्रीतीच्या पोस्टवर अभिनेता रितिक रोशनची पूर्व पत्नी सुजन खान आणि अभिषेक बच्चन यांनीही भावुक प्रतिक्रिया दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी