राष्ट्रीय

ममता बॅनर्जीचे दोन ‘मंत्री’  ईडीच्या रडारवर

टीम लय भारी

कोलकाता: ईडीने आता आपले लक्ष बंगालकडे वळवले आहे. ममता बॅनर्जी यांच्या मंत्री मंडळातील मंत्री ‘पार्थ चॅटर्जी’ यांना ईडीने अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चॅटर्जी यांची चौकशी सुरु होती. चौकशी झाल्यानंतर त्यांना ईडीने अटक केली आहे. सध्या देशातील विविध राज्यात ईडीकडून कारवाई केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईचं सत्र सुरु आहे.

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चॅटर्जी यांनी चौकशी सुरु होती. चौकशी झाल्यानंतर त्यांना ईडीने अटक केली आहे. तसेच ईडीने त्यांच्या जवळच्या मित्रांकडून करोडो रुपयांची रोकड आणि सोने जप्त केले आहे. दरम्यान  22 जुलै रोजी ईडीने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या मंत्रीमंडळात मंत्री असणारे पार्थ चॅटर्जी यांच्या घरावर छापे टाकण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ही छापेमारी सुरुच आहे. यामध्ये पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता यांच्या घरातून ईडीने 20 कोटींहून अधिक रक्कम जप्त केली होती.  त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अर्पिता यांनाही ताब्यात घेतले आहे.

अनेक तासांपासून ममता बॅनर्जी यांचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची चौकशी सुरु होती. यादरम्यान ईडीने त्यांना अनेक प्रश्न विचारले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मंत्री चॅटर्जी देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. पश्चिम बंगालच्या सरकारमधील एका मंत्र्यावर करण्यात येत असलेली कारवाई ही संपूर्ण शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित आहे. 2016 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरु झाली होती. ज्यामध्ये बनावट पद्धतीने प्रवेश मिळवण्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये लाखो रुपयांची लाच घेऊन नापास उमेदवारांना उत्तीर्ण करण्यात आले होते.

या प्रकरणात थेट शिक्षणमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप देखील केला होता. तसेच यामध्ये अनेक लोक सामील असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ममता यांचे आणखी एक मंत्री परेश अधिकारी यांच्या घरावर देखील ईडीची छापेमारी सुरु आहे.  यासोबतच त्यांच्या जवळच्या मित्रांचीही ईडीकडून चौकशी केली जात आहे. याशिवाय नोकरभरतीत घोटाळ्याशी संबंधित अन्य अधिकाऱ्यांवरही कारवाई सुरु आहे.

हे सुध्दा वाचा:

VIDEO : मुंबईच्या सौंदर्यावर कचऱ्याच्या ढिगांचे‌ तीट!

VIDEO : प्लास्टिकचा वापर आरोग्यास घातक

नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

रूपाली केळस्कर

Recent Posts

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

5 hours ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

5 hours ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

5 hours ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

6 hours ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

6 hours ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

6 hours ago