राष्ट्रीय

मै तो अन्याय खिलाफ लढा हूँ; रामदास आठवलेंनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसद गाजविली

संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवार (दि. ७) रोजीपासून सुरू झाले. आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांच्या अभिनंदन आणि स्वागतपर भाषणावेळी आपल्या नेहमीच्या आपल्या अंदाजात कविता म्हणून भाषण केले. आठवलेंच्या कवितेने सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. खासदारांनी देखील आठवले यांच्या कवितेला दाद दिली.

मैं तो अन्याय के खिलाफ लढा हूँ,
इसलिए आपको बधाई देने के लिए खडा हूँ,
आपका अनुभव बहुतही बडा है,
इसलिए आपने संघर्ष का पहाड चढा है,
मेरे पार्टी का मैं हू अकेला,
लेकीन मेरे हाथ में है संविधान का पेला,
मैं तो हूँ आपका सच्चा चेला,
मुझे मत छोडो अकेला.
जिन्होंने उपराष्ट्रपती का सर किया है गड,
उनका नाम है धनकड
हमें मिलकर उखाड देनी है विषमता की जड,
इसमें जरूर सफल होंगे आदरणीय धनकड
हाऊस में जो सदस्य करेंगे फॅक्शन,
उनके उपर होनी चाहिए कडी अॅक्शन
हमें तो मजबूत करना हैं भारत नेशन,
क्योंकी हंगामा करने की हमें नही चाहिए फॅशन”

उपराष्ट्रपती धनकड यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर भाषण करताना रामदास आठवले म्हणाले,
मी अन्यायाच्या विरोधात लढलो आहे, म्हणून तुमचे अभिनंदन करण्यासाठी मी आज येथे उभा आहे. आपला अनुभव खुपच मोठा आहे, म्हणूनच आपण संघर्षाचा पर्वत सर करू शकला आहात. माझ्या पक्षाचा मी एकमेव सदस्य आहे, पण माझ्या हातात संविधान आहे. मी आपला खरा शिष्य आहे. त्यामुळे मला एकटे सोडू नका. ज्यांनी उपराष्ट्रपतीपदाचा गड सर केला आहे, त्यांचे नाव धनकड आहे. आपल्याला सोबतीने विषमतेचे मुळ उखाडून फेकायचे आहे. आणि या कार्यात धनकड नक्कीच यशस्वी होतील. सभागृहात जे सदस्य दुफळी निर्माण करतील त्या सदस्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, आपल्याला भारत राष्ट्र मजबूत करायचे आहे. कारण केवळ हंगामा करण्याची नुसती फॅशन आम्हाला नको आहे.
हे सुद्धा वाचा
आपण मोदी-शहा यांचे हस्तक आहोत हे मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे : नाना पटोले

PHOTO : गुगलवर 2022 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलेल्या १० व्यक्ती; एकनाथ शिंदे कितव्या स्थानी?

जाती-धर्माच्या नावे विभाजन करणारे सावरकर, गोळवलकर, हेडगेवार, देवरस, मोदी हे आऊटडेटेड; छत्रपती शिवराय तर आजही आदर्श!

मंत्री रामदास आठवले हे सभागृहात कविता सादर करत असताना त्यांच्या या कवितेला सभागृहात उपस्थित खासदारांनी हसून, टाळ्या वाजवून उत्फुर्तपणे प्रतिसाद दिला. आठवले हे त्यांच्या शिघ्रकाव्यासाठी खुपच प्रसिद्ध आहेत. अनेक ठिकाणी भाषण करताना असो किंवा टीव्हीवर पत्रकारांना बाईट दोताना असो अनेकदा ते आपल्या कविता, चारोळ्यांनी आपला संदेश ते अतिशय खुमासदारपद्धतीने देत असतात. आज देखील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाषणादरम्यान कविता म्हणून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

प्रदीप माळी

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

4 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

5 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

5 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

5 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

7 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

7 hours ago