25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरराजकीयआपण मोदी-शहा यांचे हस्तक आहोत हे मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच जाहीर करून...

आपण मोदी-शहा यांचे हस्तक आहोत हे मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे : नाना पटोले

कर्नाटक सीमावाद, धारावी पुनर्विकास, मुंबईतील कोळीवाड्यांच्या जागा आदी विविध प्रश्नांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकार, एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई दररोज भडकाऊ विधाने करत आहेत, पण महाराष्ट्र सरकारकडून त्याला उत्तर दिले जात नाही. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही असे वाटावे अशी परिस्थिती आहे. आपण मोदी-शहा यांचे हस्तक आहोत हे मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे, त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा नाहीत पण महाराष्ट्राची जनता व काँग्रेस पक्ष कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, वेळ पडली तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. राज्यातील आजची परिस्थिती व राज्य सरकारची भूमिका पाहता ‘ईडी’ सरकार हे मराष्ट्रातील आतापर्यंतचे सर्वात दळभद्री सरकार आहे, असेही पटोले म्हणाले.

टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाचा खरपूस समाचार घेतला. यावेळी पटोले म्हणाले, सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे षडयंत्र आहे. सीमाभागात कर्नाटकमधील भाजप सरकार जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत आहे. महाराष्ट्र कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही. महाराष्ट्राने अजूनही संयमाची भूमिका घेतली असून आमचा संयम सुटला तर कर्नाटक व केंद्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा पटोले यांनी दिला. ते पुढे म्हणाले केंद्रातील मोदी सरकार व काही उद्योपतींच्या इशाऱ्यावर कर्नाटक अशा कुरापती काढत आहे. वास्तविक पाहता दोन राज्यात वाद उद्भवल्यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन तो सामोपचाराने सोडवला पाहिजे पण तसे होताना दिसत नाही.
हे सुद्धा वाचा
PHOTO : गुगलवर 2022 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलेल्या १० व्यक्ती; एकनाथ शिंदे कितव्या स्थानी?
जाती-धर्माच्या नावे विभाजन करणारे सावरकर, गोळवलकर, हेडगेवार, देवरस, मोदी हे आऊटडेटेड; छत्रपती शिवराय तर आजही आदर्श!
राऊतांनी नामर्द, षंढ सरकार म्हणताच, कन्नडिंगांच्या माजाविरोधात शेपूट घालून बसलेले राज्याचे मंत्री बोलण्यात दाखवू लागले मर्द बाणा!

नाना पटोले म्हणाले, धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी भाजपा सरकारने शेकडो एकर मोलाची जमीन ५ हजार कोटी रुपयांना एका उद्योगपतीच्या घशात घातली आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी दुबईच्या सी-लिंक कंपनीने ७ हजार ५०० कोटी रुपयांची निविदा भरली होती पण नंतर सरकरने ती रद्द केली. ह्या पाठीमागे काय गौडबंगाल आहे? आणि आता ५ हजार कोटी रुपयांना एका उद्योगपतीला ह्या प्रकल्पाचे काम कसे काय दिले? महाराष्ट्र सरकारने रेल्वेच्या जमिनीसाठी ७०० कोटी रुपये दिले होते पण त्यावेळी रेल्वेने महाराष्ट्र सरकारला जमीन दिली नाही, आता असे काय घडले की ही जमीन राज्य सरकारला दिली? याची उत्तरे जनतेला दिली पाहिजेत. हिवाळी अधिवेशनात सरकारला आम्ही या प्रश्नी जाब विचारणार आहोत.

मुंबईतील मोक्याच्या जमिनी या उद्योगपतीला देऊन मुंबई लुटण्याचे भारतीय जनता पक्षाचे डाव आहे. मुंबई विमानतळही याच उद्योगपतीच्या घशात घातले आहे. उद्या मुंबईतील कोळीवाड्याची मोक्याचा जागा सुद्धा भाजपा या उद्योगपतीच्या घशात घालू शकते. धारावीचा प्रश्न अत्यंत महत्वाचा असून १७ तारखेच्या मोर्चात धारावीचा मुद्दाही असावा यासाठी मविआच्या बैठकीत चर्चा करु, असे पटोले म्हणाले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!