फोटो गॅलरी

PHOTO: चित्रपटगृहात येण्यापूर्वीच ‘अवतार 2’ ने केला करोडांचा गल्ला….

ॲनिमेशन फिल्म ‘अवतार 2’ ने चित्रपटगृहात येण्यापूर्वीच अनेक कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट येत्या 16 डिसेंबरला प्रेशकांच्या भेटीस येणार आहे. 2009 साली प्रदर्शित झालेला ‘अवतार’ त्यावेळी प्रेक्षकांना खूप आवडला होता, आणि आता अवतार 2 म्हणजेच ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ मध्ये 2009 साली प्रकाशीत झालेल्या अवतार चित्रपटाची पुढची कथा दाखवण्यात येणार आहे.

तब्बल 13 वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलबाबतही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलने रिलीज होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

एका अहवालानुसार, ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट रिलीज होण्याच्या दहा दिवस आधीचं भारतात 2 लाखांहून   अधिक तिकिटांची एडवांस बुकिंग झाली आहे. हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

‘अवतार द वे ऑफ वॉटर’ या  चित्रपटाची प्री-सेल गेल्या महिन्यात (नोव्हेंबर) मध्ये पंधरा दिवस अगोदर सुरू झाली होती, ज्यामध्ये 2.15 लाख रुपयांची 2.15 लाख तिकिटे विकली गेली होती.

या चित्रपटाने एडवांस  तिकीट बुकिंगमधून 8.50 कोटी ($ 1 दशलक्ष) कमावले आहेत, त्यापैकी 3.50 कोटींची कमाई ही पहिल्याच दिवशी झालेली आहे, तर उर्वरित कमाई शनिवार आणि रविवारच्या तिकीट बुकिंगमधून झालेली आहे.

हे सुद्धा वाचा

VIDEO : अंगठ्याला दुखापत झालेली असतानाही रोहित शर्मा बॅटींगला उतरला

तुम्हाला कॉफी प्यायचे व्यसन लागले आहे का, काळजी करू नका हे आहेत उपाय

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी बाजरीची भाकरी हा उत्तम पर्याय

2009 साली प्रदर्शित झालेला ‘अवतार’ हा चित्रपट सुमारे $237 दशलक्षच्या बजेटमध्ये तयार झाला होता आणि त्याने जगभरातुन तब्बल 20 हजार 368 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.

आणि आता ‘अवतार 2’ हा चित्रपट तब्बल 250 दशलक्ष डॉलर्सच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाने   प्रकाशित होण्याच्या आगोदरच सोशल मीडियावरही चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आता ‘अवतार 2’ हा   अवतार  पार्ट 1 चा रेकॉर्ड मोडतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

Roshani Vartak

Recent Posts

जाहिरातीच्या होर्डिंगसाठी दुर्मिळ झाडाची छाटणी; पर्यावरण प्रेमींचा संताप

रविवारी पाच मे रोजी सकाळी मायको सर्कल येथील चौकातील अनेक वर्षांपासून असलेले जुने पिंपळ, चिंचेच्या…

2 hours ago

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (SMBT hospital )आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य झाली . तर एन्डोस्कोपी,…

2 hours ago

उन्हाळ्यात ब्रोकोली खाण्याचे फायदे

ब्रोकली (broccoli) उन्हाळ्यात (summer) खाल तर अनेक समस्या दूर होतील. उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर…

2 hours ago

हसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे:जागतिक हास्य दिन

जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.…

3 hours ago

सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…

4 hours ago

कांदा निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपये वाढ

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…

4 hours ago