फोटो गॅलरी

PHOTO: या सहा सोप्या सवयी ठेवतील तुम्हाला निरोगी

माणसांच्या विकासामध्ये त्यांच्या जीवनशैलीचा मोठा वाटा आहे. निरोगी दिनचर्येमुळे शरीर निरोगी राहते आणि निरोगी शरीर आपल्याला निरोगी आयुष्याकडे नेत असते. त्यामुळे माणसाने आपल्या जीवनशैलीकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे.कारण निरोगी जीवनशैली हा चांगल्या जीवनाचा पाया आहे.चला तर मग जाणून घेऊया असे 6 सोपे मार्ग, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे आरोग्य आणि जीवनशैली या दोन्हीमध्ये चांगले बदल घडवून आणू शकता..

सकाळी लवकर उठा

सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे होतात. सकाळच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते हवा सुद्धा शुद्ध असते.जे सूर्योदयानंतर कमी होऊ लागते. त्यामुळे जर तुम्ही सकाळी लवकर उठलात तर तुम्हाला फ्रेश वाटेल. सकाळी लवकर उठल्याने तुमचा दिवस मोठा होतो, ज्यामध्ये तुम्ही अधिक काम करू शकता.

वर्कआउट नक्की करातुमच्या शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. हेच कारण आहे की सकाळी लवकर व्यायाम करण्याची सवय तुमचा स्टॅमिना वाढवेल आणि तुम्हाला ऊर्जा देईल. यासोबतच तुम्ही मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि मजबूत बनता.

सकाळी नाश्ता करण्याची सवय लावा
अनेक लोक सकाळी योग्य आहार(नाश्ता) घेत नाही. आणि दुपारचे जेवण लगेच खातात. नाश्ता वगळण्याची सवय बदला आणि सकाळी व्यायाम केल्यानंतर मनापासून नाश्ता करा. यामुळे तुम्हाला दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळेल.

अधिकाधिक प्रमानात घरगुती आणि साधे अन्न खा..बाहेर खाणे टाळा,बाहेरचे जेवण कीतीही रुचकर वाटल तरी ते शरीर आणि आरोग्यासाठी चांगले नाही, त्यामुळे ते शक्य तितके कमी खावे.अधिकाधिक प्रमानात घरगुती आणि साधे अन्न खा, जेणेकरून तुमची पचनक्रिया चांगली राहते, आजारांपासून दूर राहते आणि एकूणच आरोग्य चांगले राहते.

हे सुद्धा वाचा

Mumbai News : गोवंडी परिसरात गोवरचा उद्रेक; 48 तासांत तीन बालकांचा मृत्यू

Green Tea : जेवणानंतर लगेच ‘ग्रीन टी’ पिताय? सावधान!

Health Tips : थंडीच्या दिवसांत शरीर गरम ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन आवश्यक, वाचा सविस्तर

रात्री लवकरच जेवण्याचा प्रयत्न करारात्री लवकरच जेवण्याचा प्रयत्न करा, तसेच जेवल्या नंतर लगेच झोपू नका. खाणे आणि झोपणे यामध्ये किमान 2-3 तासांचा अंतर असावा जेणेकरून अन्नाला पचायला योग्य वेळ मिळेल.

रात्री लवकर झोपण्याची सवय लावाजर तुम्ही लवकर उठलात तर रात्री उशिरापर्यंत झोपू नका. रात्री लवकर झोपण्याची सवय लावा. यामुळे तुमच्या शरीराला पूर्ण विश्रांती मिळेल आणि त्याचबरोबर कॅलरीज बर्न करणे सोपे होईल. निरोगी शरीर आणि मनासाठी किमान 8 तासांची झोप आवश्यक आहे.

 

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

8 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

10 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

10 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

11 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

12 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

12 hours ago