क्रीडा

ASIA CUP : टीम इंडियाचा पलटवार! बांग्लादेशला 59 धावांनी नमवत भारतीय संघ टॉपवर

सध्या बांग्लादेशमध्ये महिला आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. या आशिया चषकातील भारतीय महिला संघदेकील सहभागी झाला आहे. यावेळी भारतीय महिला संघाचा पूर्वीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तासोबत खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर भारतासाठी स्पर्धेतील अडचणी वाढल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, शनिवारी (8 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेश विरुद्ध 59 धावांनी मोठा विजय मिळवल्याने महिला क्रिकेट संघाला दिलासा मिळाला आहे.

महिला आशिया चषक 2022 च्या त्यांच्या सामन्यात भारताने यजमान बांगलादेशचा 59 धावांनी पराभव केला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने पाच गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ 100 धावा करू शकला. पाच सामन्यांमधला भारताचा हा चौथा विजय आहे. शुक्रवारी त्यांना पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. भारत आणि बांगलादेश यांच्यातील महिला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील हा 13वा सामना होता आणि भारताने यापैकी 11 सामने जिंकले आहेत.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : एकनाथ शिंदे रात्री आठ वाजता सुद्धा सामान्य लोकांना भेटतात

Mohan Bhagwat Statement: मोहन भागवत यांच्या पापलाक्षणाच्या विधानावर आता चर्चांना उधाण!

Eknath Shinde: शिंदे गटाचा कार्यकर्ता दसरा मेळाव्याला आला, पण….

बांगलादेशविरुद्धच्या महिला आशिया चषक क्रिकेट सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 159 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर शेफाली वर्माने 55 धावा केल्या तर हरमनप्रीत कौरला विश्रांती दिल्यानंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या स्मृती मंधानाने 47 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्ज ३५ धावांवर नाबाद राहिली. बांगलादेशकडून रुमाना अहमदने तीन बळी घेतले. यावेळी भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या शेफाली वर्मा हिला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाची सुरुवात चांगली झाली पण भारतीय गोलंदाजांनी धावगती नियंत्रणात ठेवली. बांगलादेशने 10.3 षटकात 50 धावा पूर्ण केल्या. फरगाना हक आणि मुर्शिदा खातून यांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या पण 8 धावा प्रति षटकाचा रन रेट खूप जास्त होता. यानंतर कर्णधार निगार सुलतानाने 29 चेंडूत 36 धावा केल्या पण त्याही पुरेशा ठरल्या नाहीत.

दरम्यान, सध्या महिला आशिया चषकाच्या क्रमवारीतक भारतीय महिला संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानी महिला संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. या स्पर्धेतील भारताचा पुढचा सामना सोमवारी (10 ऑक्टोबर) थायलंड क्रिकेट संघाविरुद्ध होणार आगहे. त्यानंतर बाद फेरीस सुरुवात होईल. 2022 महिला आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. यावेळी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमने-सामने असतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 day ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

4 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

4 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

4 days ago