29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
HomeराजकीयMohan Bhagwat Statement: मोहन भागवत यांच्या पापलाक्षणाच्या विधानावर आता चर्चांना उधाण!

Mohan Bhagwat Statement: मोहन भागवत यांच्या पापलाक्षणाच्या विधानावर आता चर्चांना उधाण!

शरद पवार नागपूर दौऱ्यावर असून विमानतळावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना मोहन भागवत यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारली असता सांगितले की, मोहन भागवतांचे वक्तव्य माझ्या वाचनात आलं आहे, ही गोष्ट समाधानाची आहे. समाजातील एका मोठ्या वर्गाच्या काही पिढ्यांना यातना सहन कराव्या लागल्या. या यातनांची जाणीव त्या घटकाला होत असून, हा योग्य बदल आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी एका ग्रंथ प्रकाशनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. यावेळी जातीव्यवस्थेबद्दल त्यांनी आपले विचार मांडले. त्यांच्या भाषणावर आता सर्वस्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले होते की,  ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होते,  त्या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही”

ही समाधानाची गोष्ट : शरद पवार

शरद पवार नागपूर दौऱ्यावर असून विमानतळावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना मोहन भागवत यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारली असता सांगितले की,  मोहन भागवतांचे वक्तव्य माझ्या वाचनात आलं आहे, ही गोष्ट समाधानाची आहे. समाजातील एका मोठ्या वर्गाच्या काही पिढ्यांना यातना सहन कराव्या लागल्या. या यातनांची जाणीव त्या घटकाला होत असून, हा योग्य बदल आहे. पण, नुसतं माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाबाबत भूमिका कशी घेतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.

तुम्ही मौलवींना भेटायला मशिदीत जाता; आता तुम्हीच पापलाक्षण करा : आनंद दवे

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भागवत यांच्या या विधानावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, ब्राह्मणांनी माफी मागितली पाहिजे हे मोहन भागवत यांचं कालचं त्यांचं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी अभ्यासाशिवाय हे विधान केलं आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. ब्राह्मणांनी काही चुका केल्या असतील तर ब्राह्मण समाजातील काही लोकांनी त्याला विरोधही केला आहे. हे भागवतांनी सांगितले नाही. तुम्ही महाराष्ट्रात नाही तर भारतात जातीवाद वाढवत आहात. पापक्षालन करण्याची गरज तुम्हाला आहे. आतापर्यंत हिंदुत्वाचा जागर केला आणि आता मशिदीत मौलवींना भेटायला जात आहात. म्हणून आता पापक्षालन तुम्हीच करायला हवं, असा सल्लाही त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा –

Eknath Shinde: शिंदे गटाचा कार्यकर्ता दसरा मेळाव्याला आला, पण….

Delhi Detention Policy : मुलांना 8वी पर्यंत पास करण्याच्या निर्णयात बदल; दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

BMC News: मुंबई महानगरपालिकेने दुकानदारांना मराठी पाटया लावण्यासाठी दिली 10 दिवसांची मुदत

निवडणुका आल्या की अशी विधाने: जयंत पाटील

भागवत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या, की अशी काही विधाने करणे आणि त्या वर्गाला चुचकारणे असे धोरण काही लोकांचे असू शकते. या गोष्टींना जर बळ दिले, तर मला खात्री आहे की मोहन भागवत भाजपाच्या नेत्यांना यासंदर्भात लोकांना विश्वास वाटेल, अशी काही पाऊले टाकायला सुचवतील. यातून ते जे भाष्य करतायत, त्याची अंमलबजावणी होऊ शकेल.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी