क्रीडा

‘कौन प्रवीण तांबे’ बायोपिक पाहून क्रिकेटपटू प्रवीण तांबें झाला भावूक

टीम लय भारी

कौन प्रवीण तांबे : क्रिकेटपटू प्रवीण तांबे (Cricketer Pravin Tambe) यांचा जीवनावर आधारित ‘कौन प्रवीण तांबे’ (Kaun Pravin Tambe) हा बायोपिक नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता श्रेयस तळपदेनं (Shreyas Talpade) प्रवीण तांबेंची भूमिका साकारली आहे. प्रवीण यांनी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघासोबत हा चित्रपट पाहिला.

चित्रपट पाहिल्यानंतर त्याबद्दल भावना व्यक्त करताना प्रवीण (Cricketer Pravin Tambe) यांना अश्रू अनावर झाले. केकेआरच्या सोशल मिडीया वरील ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये प्रवीण तांबे हे केकेआर टीम आणि इतर स्टाफ मेंबर्ससोबत हा चित्रपट पाहताना दिसत आहेत. चित्रपट संपल्यानंतर ते काही शब्द बोलण्यासाठी उभे राहिले, पण भावना व्यक्त करताना त्यांचा कंठ दाटून आला.

कौन प्रवीण तांबे

प्रवीण तांबे (Cricketer Pravin Tambe) हा मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलगा आहे. इंडियन प्रिमियर लीग सारख्या जगप्रसिध्द स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने केलेला संघर्ष या चित्रपटातून उलगडला आहे. प्रवीण तांबे हे मुंबईच्या टेनिस क्रिकेटमधलं एक मोठ नाव. गल्लीबोळातून वरती आलेल्या प्रवीण तांबेंनी मुंबईच टेनिस क्रिकेट गाजवलंच, पण सीजन बॉलने खेळल्या जाणाऱ्या लेदर क्रिकेटमध्येही आपली ओळख निर्माण केली. तुमच्यात टॅलेंट असेल, तर जग तुमची दखल घेत, हेच या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. क्रिकेटपटूने वयाची पसतीशी ओलांडली की, ते निवृत्ती घेतात. पण प्रवीण तांबेंनी (Cricketer Pravin Tambe) वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये डेब्यू केला.

हे सुध्दा वाचा :

‘Kaun Praveen Tambe’: Twitterati calls Pravin Tambe’s life an inspiration

किरीट सोमय्यांचा ट्विटरवर आणखी एक बॉंम्ब , हसन मुश्रीफांचा मुलगा, जावई आणि इतर 7 जणांविरुद्ध एफआयआर करणार


Jyoti Khot

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

11 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

12 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

12 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

12 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

13 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

15 hours ago