महाराष्ट्र

किरीट सोमय्यांचा ट्विटरवर आणखी एक बॉंम्ब , हसन मुश्रीफांचा मुलगा, जावई आणि इतर 7 जणांविरुद्ध एफआयआर करणार

टीम लय भारी

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा सपाटा लावला आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन नुकताच दापोली दौरा केला होता. या दौऱ्यानंतर किरीट सोमय्यांच्या रडारवर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आले आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ परिवाराच्या घोटाळ्याबाबत आणखी एक बॉम्ब ट्विटरद्वारे फोडला आहे.किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ परिवारावर 158 कोटींचा घोटाळयाचा आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. (Kirit somaiya on Hasan mushrif)

त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीच्या 12 नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. या घोटाळ्यांमधील 12 जणांना ‘डर्टी डझन’ अशी उपाधी कीरीट सोमय्या यांनी दिली आहे.

हसन मुश्रीफ परिवार ₹१५८ कोटींचा घोटाळा, हसन मुश्रीफ यांचा मुलगा, दामाद आणि इतर ७ विरुद्ध पोलिस एफआयआर FIR नोंदवतील, चौकशी व कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. ED इ डी आणी आयकर विभागनी कठोर कारवाई करावी या साठी मी पाठपुरावा करत आहे , असा इशारा देत किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे.

 


हे सुद्धा वाचा :

कीरीट सोमय्यांचा दापोलीत दौरा

किरीट सोमय्यांच्या रडारवर हसन मुश्रीफ, 50 दिवसांत ‘डर्टी डझन’ जेलमध्ये जाणार?

Pratiksha Pawar

Recent Posts

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटी येथे हातगाडीला आग

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटीत (State Bank Chowk Chowpatty) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातगाडीला लागलेली आग…

19 mins ago

नाशिक इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश

इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह (child marriage) रोखण्यात बाल आयोगाला यश(Success in…

1 hour ago

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण…

2 hours ago

उन्हाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

गुळामध्ये ( jaggery) व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक…

2 hours ago

पिंपळगाव येथे महिन्याभरात सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प

एप्रिल महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याचे (onions) आवक होत असते. महिन्याभरापासून…

2 hours ago

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पोलीस गृहभेटीला

मानवी जीवनाच्या अर्ध्या टप्प्यावर आयुष्याचा लेखाजोखा मांडत असताना प्रेम, आपुलकी, स्नेह, आत्मीयता, आदर व ईश्वर…

2 hours ago