क्रीडा

Ind vs SA 2nd ODI : श्रेयस अय्यर व इशान किशनच्या झंझावातापुढे दक्षिण आफ्रिकेचा संघ झुकला; मालिकेत साधली 1-1 अशी बरोबरी

भारतीय‍ क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका विरूद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली आहे. रांचीमधील झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता. रविवारी झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि ईशान किशन हे मेन इन ब्लूसाठी शोचे स्टार होते. त्यांनी 161 धावांची मोठी भागीदारी केली. श्रेयसने त्याच्या कारकिर्दीतील दुसरे एकदिवसीय शतक झळकावताना 113 धावांची नाबाद खेळी केली तर किशनने केवळ 84 चेंडूत 93 धावांची शानदार खेळी केली.

तत्पूर्वी, कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिलसह दोन्ही सलामीवीर पॉवरप्लेमध्ये बाद झाल्याने भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. किशन बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने श्रेयसला भक्कम साथ दिली त्यामुळे यजमानांनी सहजतेने आघाडी घेतली. सॅमसनने 36 चेंडूंत 30 धावांची खेळी करत क्रीजवर नाबाद राहिला.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सामना सुरू होण्यापूर्वी मोठा धक्का बसला कारण कर्णधार टेंबा बावुमा आजारपणामुळे खेळू शकला नाही. स्टँड-इन कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक आणि जेनेमन मलान यांनी खराब खेळी केली. परंतु, एडन मार्कराम (79) आणि रीझा हेंड्रिक्स (74) यांच्यातील 129 धावांच्या भागीदारीने पाहुण्यांना मोठ्या धावसंख्येच्या मार्गावर परत आणले.

हे सुद्धा वाचा –

Mumbai Rainfall Alert: सोमवारी मुंबई मध्ये पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Tej Pratap Yadav: तेज प्रताप यादव व श्याम रजक यांचा राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये धिंगाणा

Student Scholarships: ऑक्टोबर ते डिसेंबर च्या काळामध्ये विद्यार्थी या तीन शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज करू शकतात

हेन्रिक क्लासेनच्या 26 चेंडूत 30 धावा आणि डेव्हिड मिलरच्या 34 चेंडूत नाबाद 35 धावांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला मोठी मजल मारता आली आणि धावफलकावर 278 धावा केल्या. मोहम्मद सिराजने 10 षटकांच्या स्पेलमध्ये तीन विकेट घेतल्या आणि केवळ 38 धावा दिल्या. वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा मंगळवारी तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना 11ऑक्टोबर रोजी दिल्लीला खेळवला जाणार आहे.

 

अश्विन शेश्वरे

He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

5 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

5 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

6 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

7 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

8 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

9 hours ago