31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeमुंबईMumbai Rainfall Alert: सोमवारी मुंबई मध्ये पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता; IMD...

Mumbai Rainfall Alert: सोमवारी मुंबई मध्ये पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

हवामान विभागाकडून रविवारसाठी मुंबईसाठी कोणताही अलर्ट जारी झाला नाही परंतु, सोमवारसाठी मुंबई, ठाणे आणि पालाघरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

मागील एका दशकात मुंबईमध्ये ऑक्टोबर महिन्यात सलग दोन वर्षांपासून सर्वाधिक एकदिवसीय पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रूझ वेधशाळेत शनिवारी 113 मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी 15 ऑक्टोबर रोजी सर्वात जास्त पावसाची नोंद झाली होती. 4 ऑक्टोबर 1988 रोजी एका दिवसात आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस 140 मिमी नोंदला गेला. संपूर्ण ऑक्टोबरच्या सरासरी 89 मिमीच्या तुलनेत मुंबई शहरात आतापर्यंत 115 मिमी पाऊस झाला आहे.

शुक्रवारी अचानक पाऊस पडल्यामुळे अनेक नागरिक अडकून पडले होते. सकाळी आकाश निरभ्र होते परंतु, संध्याकाळी शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सांताक्रूझमध्ये शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत 24 तासांत 113.8 मिमी पाऊस झाला. तसेच कुलाबा येथे याच कालावधीत ८५.२ मिमी पाऊस झाला.

तुळशी (१६९ मिमी) आणि विहार (१३९ मिमी) येथे मुसळधार पाऊस झाला असला तरी मुंबईबाहेरील इतर तलावांमध्ये २५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला नाही. तुळशी आणि विहार तलाव आकाराने लहान आहेत, त्यामुळे एकूण तलावांचा साठा 97.5 टक्के राहिला. हवामान विभागाकडून रविवारसाठी मुंबईसाठी कोणताही अलर्ट जारी झाला नाही परंतु, सोमवारसाठी मुंबई, ठाणे आणि पालाघरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा –

Dhanjay Munde: पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्या नंतर जयंत पाटील, धनंजय मुंडे भगवान गडावर

BJP MLA Death Threat : पीएफआयकडून भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी! पोलिस तपासाला सुरुवात

Baramati Election: बारामती जिंकण्याची ताकद फक्त महादेव जानकरांमध्येच, रासपचे भाजपला आव्हान !

एका दशकातील हा केवळ एक दिवसाचा सर्वाधिक पाऊस नाही तर या महिन्यात सलग दोन वर्षे अतिवृष्टी झाली. साल 2021 मध्ये, 15 ऑक्टोबर रोजी 86.5 मिमी पाऊस पडला. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी मासिक एकूण पाऊस 170 मिमी होता जो मागील दशकातील दुसऱ्या क्रमांकाचा उच्चांक होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दुपारी 2 ते संध्याकाळी 7 आणि शनिवारी पहाटे 3 ते पहाटे 5 या वेळेत बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. फोर्ट, ग्रँट रोड आणि परळ या भागांमध्ये 200 मिमीपेक्षा जास्त पाऊसाची नोंद झाली.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी