क्रीडा

IPL 2024: हार्दिक पांड्यानी दिलं ट्रोल करणाऱ्यांना उत्तर, पोस्ट शेअर करत म्हटलं असं काही…

IPL 2024 सुरु होण्याअगोदर पासूनच मुंबई इंडियन्सचा संघ चर्चेत आहे. IPL 2024 सुरु झाल्यानंतर मुंबई इंडियन्स चा कर्णधार हार्दिक पांड्याला सर्वेच ट्रोल करत आहेत. त्यातच सलग तीन सामने हरल्यानंतर आता चाहते हार्दिकच्या ऐवजी पुन्हा रोहित शर्माला कर्णधारपदावर पाहण्याची चर्चा करत आहे. (IPL 2024 hardik pandya answers criticism telling mumbai indians) सोमवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोणीच मुंबईच्या कर्णधारचे स्वागत केले नाही. या सर्व गोष्टींची हार्दिकला देखील जाणीव आहे. म्हणूनच राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाल्यानंतर हार्दिकने अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्ट द्वारे त्याने त्याला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहेत. (IPL 2024 hardik pandya answers criticism telling mumbai indians)

सलग तिसरा सामना हरल्यानंतर हार्दिक पांड्याने स्वतःला ठरवले जबाबदार, म्हणाला- ‘माझ्या विकेटने…’,

हार्दिक पांड्याने मंगळवारी त्याच्या एक्स हँडलवर मुंबई इंडियन्स संघाचा फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनवरचा संदेश अप्रतिम होता. हार्दिकने लिहिले की, ‘या टीमबद्दल तुम्हाला एक खास गोष्ट माहीत असेल तर ती म्हणजे आम्ही कधीही हार मानत नाही. आम्ही लढत राहू आणि पुढे जात राहू.” उल्लेखनीय आहे की, हार्दिकला सर्वत्र ट्रोल केले जात आहे. केवळ चाहतेच संतापले नाहीत, तर माजी खेळाडूही सातत्याने वक्तव्ये आणि पोस्ट शेअर करत आहेत. अशा परिस्थितीत हार्दिकचं हे एक प्रकारे सगळ्यांनाच उत्तर आहे. (IPL 2024 hardik pandya answers criticism telling mumbai indians)

पुढील सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याचे कर्णधारपद हिरावून घेतले जाणार का? माजी क्रिकेटपटूने केला मोठा खुलासा

हार्दिक पांड्या कर्णधार झाल्यापासून हा राग कायम आहे. जिंकणे आणि हरणे हा खेळाचा भाग आहे, परंतु हंगामापूर्वीच मुंबई इंडियन्सबाबत नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर दिसून येत आहे. चाहते जल्लोष करत असतानाच, मनोज तिवारीसारख्या माजी क्रिकेटपटूंचेही मत आहे की रोहितला पुन्हा कर्णधार बनवायला हवे. पण आत्तापर्यंत रोहितने एकाही सामन्यात असे वागले नाही की त्याला हे हवे आहे असे वाटते. त्याने प्रत्येक संधीवर हार्दिकला साथ दिली, त्याला प्रोत्साहन दिले आणि खांद्याला खांदा लावून चालला. (IPL 2024 hardik pandya answers criticism telling mumbai indians)

T20 वर्ल्ड कप 2024 साठी पाकिस्तानची टीम कोचकडून नव्हे तर लष्कराकडून घेत आहे प्रशिक्षण, जाणून घ्या कारण

मुंबई इंडियन्सने गुजरात, हैदराबाद आणि राजस्थानविरुद्ध पहिले तीन सामने गमावले आहेत. सोमवारी मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावरही पराभवाला सामोरे जावे लागले. आता संघाला पुनरागमन करायचे असेल तर सलग 3-4 सामने जिंकावे लागतील. तरच संघाचे मनोबल परत येईल. आता 7 एप्रिलला मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. (IPL 2024 hardik pandya answers criticism telling mumbai indians)

काजल चोपडे

Recent Posts

नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला, मुद्देच नसल्याने धार्मिक ध्रुविकरणाचा प्रयत्न: पवन खेरा

लोकसभा निवडणुकीच्या ( Loksabha election) प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तोंड उघडले की वाद…

14 mins ago

रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे RSS चे एजंट

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा, म्हणजेच पाचवा टप्पा उरलेला आहे. या टप्प्यात मुंबई, ठाणे व उत्तर…

33 mins ago

पोपट सोबत असल्यास भविष्यवाणीला महत्व…; उमेश पाटील

मुंबईत लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचार करण्यासाठी अवघे दोन दिवस हातात…

42 mins ago

गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे…

1 hour ago

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

2 hours ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago