35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्रीडाT20 वर्ल्ड कप 2024 साठी पाकिस्तानची टीम कोचकडून नव्हे तर लष्कराकडून घेत...

T20 वर्ल्ड कप 2024 साठी पाकिस्तानची टीम कोचकडून नव्हे तर लष्कराकडून घेत आहे प्रशिक्षण, जाणून घ्या कारण 

येत्या जून महिन्यामध्ये  T20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) खेळला जाणार आहे. या T20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानच्या संघाने (Pakistan cricket team) आपली तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. शाहीन आफ्रिदीच्या जागी बाबर आझमला पुन्हा एकदा पाकिस्तान संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. (T20 world cup 2024 pakistan army train pakistan cricket team)

येत्या जून महिन्यामध्ये  T20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) खेळला जाणार आहे. या T20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानच्या संघाने (Pakistan cricket team) आपली तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. शाहीन आफ्रिदीच्या जागी बाबर आझमला पुन्हा एकदा पाकिस्तान संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. (T20 world cup 2024 pakistan army train pakistan cricket team)

याचदरम्यान आता पाकिस्तान संघाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये पाकिस्तानचा संघ आगामी T20 वर्ल्ड कप पूर्वी लष्करासोबत विशेष सराव करत आहे. कोणत्याही देशाच्या क्रिकेट संघाला प्रशिक्षकांकडून  नव्हे तर लष्कराकडून प्रशिक्षण देण्याची ही पहिलीच वेळ आहे. (T20 world cup 2024 pakistan army train pakistan cricket team)

चेन्नई विरुद्ध सामन्यात ऋषभ पंतने केली ही मोठी चूक, BCCI ने ठोठावला 12 लाखांचा दंड

आजकाल पाकिस्तान क्रिकेट संघ पाकिस्तानी लष्करासोबत प्रशिक्षण घेत आहे. काकुल येथील लष्कराच्या प्रशिक्षण शिबिरात पाकिस्तानी क्रिकेटपटू घाम गाळत आहेत. विविध व्यायाम आणि कवायती करताना खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये खेळाडू भिंती उड्या मारण्यापासून दोरीवर चढण्यापर्यंत सराव करताना दिसत आहेत. आता प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की पाकिस्तानी क्रिकेटपटू लष्करासोबत प्रशिक्षण का घेत आहेत. (T20 world cup 2024 pakistan army train pakistan cricket team)

ऑरेंज कॅपच्या लिस्टमध्ये झाली या धडाकेबाज फलंदाजाची एन्ट्री, पहा कोण आहे हा खेळाडू

खरं तर, बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या फिटनेस टेस्ट घेतल्या जात नव्हत्या आणि खेळाडू फिटनेसशिवाय क्रिकेट खेळत होते. अशा परिस्थितीत पाकिस्तानी लष्कराने आगामी  T20 वर्ल्ड कप पूर्वी खेळाडूंच्या फिटनेसबाबत मदतीचा हात पुढे केला आहे. (T20 world cup 2024 pakistan army train pakistan cricket team)

पंजाब किंग्स विरुद्ध सामन्याआधी लखनऊ सुपर जायंट्समध्ये झाली ‘या’ वेगवान गोलंदाजाची एन्ट्री

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने T20 वर्ल्ड कपपूर्वी बाबर आझमला पुन्हा एकदा वनडे आणि टी-20  फॉरमॅटचा कर्णधार बनवले आहे. त्यानंतर आता बाबर आझम २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. वास्तविक, बाबर २०२३ च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाचा कर्णधार होता आणि या स्पर्धेत संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. त्यानंतर बाबर आझमला हटवून शाहीनला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आला. (T20 world cup 2024 pakistan army train pakistan cricket team)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी