क्रीडा

आयपीएलच्या स्पर्धेला आजपासून शुभारंभ

टीम लय भारी

मुंबई: आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-२० लीग मानली जाते. इंडियन प्रीमियर लीगचं (Indian premier league 2022) पंधराव्या उत्सवाला आज(२६ मार्च) पासून सुरुवात होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs KKR ) नव्या नेतृत्वासह मैदानात उतरणार आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व युवा भारतीय फलंदाज श्रेयस (Shreyas iyer) अय्यरकडे असेल, तर चेन्नई सुपर किंग टीमच्या नेतृत्वाचा महान वारसा धोनीने आता जडेजाकडे (Ravindra jadeja) सोपवला आहे. (IPL)

गेल्या पर्वात अंतिम सामना या दोन संघांमध्ये झाला होता.हा सामना चेन्नईने जिंकत विजेतेपद स्वतःच्या नावावर केले होते. चेन्नई सुपर किंग्जला चार वेळा विजेतेपद मिळवून देणारा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने अचानकपणे चेन्नईचे कर्णधारपद सोडले. धोनीने (Mahendra Sigh Dhoni) चेन्नई संघाचे कर्णधारपद रविंद्र जाडेजाकडे सोपवले आहे.

आजचा सामना हा चेन्नई सुपर किंग विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स सोबत रंगणार आहे. आयपीएलचे सर्व सामने हे महाराष्ट्रात होणार असून यात मुंबईतील ३ आणि पुण्यातील १ स्टेडियमचा समावेश आहे. २६ मार्च रोजी होणारी मॅच पहिली लढत मुंबईच्या वानखेडे सेडियम(Wankhede Stadium) संध्याकाळी ७:३० मध्ये होणार आहे.

चेन्नईसुपरकिंग टीम आतापर्यंत चार वेळा तर कोलकाता नाईट रायडर्सने दोन वेळा आयपीएलचे विजेतेपदक मिळवले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये चेन्नईने अंतिम सामन्यात कोलकाताचा पराभव करून चौथे विजेतेपद मिळवले होते. यंदाचे आयपीएलचे(Indian premier league 2022) पदक कोणती टीम पटकवणार याची उत्सुकता क्रिकेटच्या चाहत्यांना लागून राहली आहे.(IPL)

हे सुध्दा वाचा

IPLचा आज शुभारंभ; पहिली लढत CSK vs KKR, कधी आणि कुठे पाहाल

IPL धोनीने चेन्नई सुपरकिंग्जच्या कर्णधारपदाचा मुकुट सोपवला रविंद्र जडेजाकडे

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders: Weather Forecast And Pitch Report Of Wankhede Stadium, Mumbai- IPL 2022, Match 01, CSK vs KKR

Jyoti Khot

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

3 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

5 hours ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

6 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

7 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

7 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

7 hours ago