29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्रिकेटIPL धोनीने चेन्नई सुपरकिंग्जच्या कर्णधारपदाचा मुकुट सोपवला रविंद्र जडेजाकडे

IPL धोनीने चेन्नई सुपरकिंग्जच्या कर्णधारपदाचा मुकुट सोपवला रविंद्र जडेजाकडे

टीम लय भारी

चेन्नई:  चेन्नई सुपरकिंग्जच्या (ipl) फॅनसाठी आणि एम. एस. धोनीच्या (ms dhoni) चाहत्यांसाठी  चेन्नईच्या गोठातून मोठी बातमी आली आहे. चेन्नई सुपरकिंग्ज टीमचा लाडका कॅप्टन धोनीनं चेन्नई संघाचं कर्णधारपद सोडलं. चेन्नई सुपरकिंग्स या टीमचं नेतृत्व आता अष्टपैलू फलंदाज रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आलं आहे. Dhoni’s resignation, resignation of CSK captaincy

चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकृत ट्वीटर खात्यावर याची घोषणा करण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्सची पहिली मॅच शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध (CSK vs KKR) शनिवारी होणार आहे. त्यापूर्वी धोनीनं हा मोठा निर्णय घेतला आहे.

यंदाच्या आयपीएल २०२२ मध्ये जडेजा हा चेन्नईकडून रिटेन करण्यात आलेला सर्वात महागडा खेळाडू आहे. एमएस धोनीला संघाने १२ करोड रुपयांना खरेदी केले होते. तर जडेजाला चेन्नईने १६ करोड रुपयांना खरेदी केले आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या टीमने २१३ पैकी १३०  सामने जिंकले आहेत.रविंद्र जडेजाकडे कॅप्टनपद सोपवण्याचा निर्णय योग्य आहे की नाही हे येत्या काही दिवसांमध्ये समजेलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी