क्रीडा

Robin Uthappa Retires : रॉबिन उथप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून स्वीकारली निवृत्ती

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) उजव्या हाताचा फंलदाज रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय क्रिकेट संघाने 2007 साली पार पडलेल्या पुरूषांच्या प्रथम विश्वचषक स्पर्धेचे (T-20 World Cup) जेतेपद मिळविण्याचा मान मिळविला होता. त्यास्पर्धेत रॉबिन उथप्पा भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग होता. परंतु, आता निवृत्ती स्वीकारल्यानंतर उथप्पा कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार नाही. 36 वर्षीय उथप्पाने भारतातर्फे शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2015 मध्ये खेळला होता. त्याने आपल्या सोशल मीडीयाच्या अंकाटसद्वारे निवृत्ती स्वीकारल्याचे जाहीर केले. त्याने आपल्या चाहत्यांना दिलेल्या संदेशमध्ये असे लिहीले की, क्रिकेटमध्ये मला देशाचे आणि कर्नाकट राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी सर्वात मोठी अभिमानाची बाब आहे. मला वाटते सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टींचा अंत होणे स्वाभाविक गोष्ट आहे. त्यामुळे मी भारतीय‍ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मला माझ्या संपूर्ण कारकीर्दीत पाठिंबा दिल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, कर्नाटक क्रिकेट संघटना, माझे सहकारी खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि चाहत्यांचा मी सदैव ऋणी राहीन.

त्याने पुढे असे नमूद केले की, मी सुमारे वीस वर्षांपूर्वी व्यवसायिक क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. भारतीय क्रिकेट संघाचे आणि कर्नाटक क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी सन्मानाची, आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये माझी एक चांगला माणूस म्हणून जडणघडण होण्यास मदत झाली.‍

रॉबिन उथप्पाने भारतीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून निवृत्ती स्वीकारल्यामुळे आता त्याला इतर देशात खेळवल्या जाणऱ्या टी-20 लीग्स मध्ये खेळण्याचा पर्याय मोकळा झाला आहे.

हे सुद्धा वाचा –

Moonlighting And Market: कर्मचाऱ्याने एकाच वेळी दोन संस्थांमध्ये काम करणे हे नैतिकतेला धरून नाही

Ajit Pawar : जळगावच्या सभेत अजित पवारांनी सरकारचे कान उपटले

Shivajirao Adhalarao Patil : शिंदे गटातील नेते आढळराव पाटलांच्या अडचणीत वाढ

रॉबिन उथप्पाने 2004 साली झालेल्या अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2006 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केले. उथप्पाने 46 एकदिवसीय आणि 13 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले.

उथप्पाने एकदिवसीय सामन्यांमध्ये 934 आण‍ि टी-20 सामन्यांमध्ये 249 धावा केल्या. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने 9446 आणि लिस्ट – A कारकीर्दीत 6543 धावा केल्या.

उथप्पा त्याच्या आयपीएल क्रिकेटच्या कारकीर्दीत 2014 मोसमाचा विजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि 2021 मोसमाचा विजेता संघ चैन्नई सुपर किंग्स या संघाचा भाग होता.

 

अश्विन शेश्वरे

He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

Recent Posts

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

35 mins ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

2 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

3 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

17 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

19 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

19 hours ago