राजकीय

Shivajirao Adhalarao Patil : शिंदे गटातील नेते आढळराव पाटलांच्या अडचणीत वाढ

सध्या राज्यात शिंदे गट आणि भाजप यांच्यात सत्तेसाठी खेळीमेळीचे वातावरण दिसत असले तरीही प्रत्यक्षात शिंदे गटातील नेत्यांची भाजपकडून अप्रत्यक्षरित्या गळचेपीच होत आहे, तरीसुद्धा सगळं ‘ओक्के’मधे असं म्हणण्यात शिंदे गटातील नेते धन्यता मानत असल्याने त्यांच्या भूमिकेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे. असेच काहीसे शिंदे गटातील नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबाबतीत घडले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील यांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीत निवडून यायचे आहे, त्यामुळे ते सध्या जास्त प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत परंतु बारामतीनंतर भाजपने आपला मोर्चा शिरुरकडे वळवला असून केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंग यांना तेथील उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने पाटलांचे टेन्शन वाढणार आहे.

शिरुर तालुका पुण्यातील महत्त्वपूर्ण तालुका मानण्यात येतो. भल्याभल्यांची तिथे नजर लागलेली असते, अशातच पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून शिंदे गटातील नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटात जाणे पसंत केले जेणेकरून भाजपच्या मदतीने पुन्हा येण्याचे स्वप्न पुर्ण करता येईल परंतु यावेळी भाजपने वेगळीच खेळी खेळली असून शिंदे गटातील नेत्यांसाठी सुद्धा मोठं आव्हान समोर ठेवले आहे. बारामतीनंतर भाजपने आपला मोर्चा शिरुरकडे वळविला असून तिथे केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. स्पर्धेत भाजपच प्रतिस्पर्धी उभा राहिल्याने आढळराव पाटलांची चांगलीच गोची झाली आहे.

हे सुद्धा वाचा..

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या झोपेवर‍ अजित पवरांचा सवाल !

Amravati News : ‘ते’ दोघे दर्ग्याच्या आवारात झोपले आणि….

Ajit Pawar : जळगावच्या सभेत अजित पवारांनी सरकारचे कान उपटले

दरम्यान यावर बोलताना रेणुका सिंग म्हणाल्या, विकास हवा असेल तर भारतीय जनता पक्षच हवा. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला शिरुर लोकसभा मतदारसंघात भाजपला मजबूत करण्यासाठी पाठवलंय. जागा कुणाचीही असू द्या, मी शिरुरमध्ये भाजपचं संघटन मजबूत करण्यासाठी आलेय. लोकसभा निवडणुकीचा उमेदवार कोण असेल, कुठल्या जातीचा असेल? यावर सध्या आम्ही विचार करत नाही. पण यावेळी आम्ही आमची ताकद आजमवणार आहोत असे म्हणून रेणुका सिंगने आपली अप्रत्यक्षरीत्यरित्या उमेदवारी जाहीर केली आहे.

खरंतर राज्यात भाजप आणि शिंदे गट यांची सत्तेसाठी युती असल्याने यापुढे सुद्धा निवडणुकांमध्ये सामंजस्याची भूमिका स्विकारून नेत्यांना उमेदवारी प्रदान करतील असा कयास असताना मात्र प्रत्यक्षात वेगळीत परिस्थिती पाहायला मिळत आहे. भाजपचे प्लॅनिंग आधीच झाल्यामुळे बहुधा त्यात शिंदे गटातील नेत्यांना स्थान नाही असेच काहीसे चित्र दिसत आहे. शिरुरमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळी डाॅ. अमोल कोल्हे खासदार यांच्याशी तगडी स्पर्धा होती आता हीच स्पर्धा शिवाजीराव आढळराव पाटील यांना त्यांचे युती मित्र भाजपच्या विरोधात लढावी लागणार आहे, या लढाईत पाटलांना अस्तित्व टिकवण कठीण जाणार अशा वावड्याच आता उठू लागल्या आहेत.

भाजपने येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीला अजून वेळ असला तरी निवडणूक जिंकण्यासाठीची सगळीच तयारी भाजपकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विद्यमान खासदारांच्या जागा वगळून इतर जागा काबीच करण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत आणि याबाबत योग्य ती काळजी घेण्यासाठी, चक्रव्यूव्ह रचण्यासाठी थेट केंद्रीय मंत्र्यांना मतदारसंघ ठरवून देत त्यांना दौरा करण्यास सांगितले आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याआधी शिरुर मतदार संघात हार पत्करावी लागली, परंतु ते आजही निवडून येण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ज्यावेळी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये होते त्यावेळी शिरुर मतदारसंघाची जागा डाॅ. अमोल कोल्हे यांच्यासाठीच रिक्त ठेवण्याचा उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतल्याने आढळराव पाटील यांनी शिंदे गटात जाणे पसंत केले, परंतु इथे सुद्धा भाजपशी हातमिळवणी करून सुद्धा काहीच फायदा झालेला नाही त्याउलट भाजपच आपला उमेदवार तिथे उभा करणार असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांची चारही बाजूंनी कोंडी झाली आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…

28 mins ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

2 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

3 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

4 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

5 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

19 hours ago