क्रीडा

कुस्तीगीर पुन्हा एकदा आक्रमक; सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सज्जड इशारा

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी बुधवारी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. भारतीय कुस्तीगीरांच्या या धरणे आंदोलनाला सर्व स्तरांतून वाढता पाठिंबा मिळत असून, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कुस्तीगीरांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्तीगीर महासंघाची निवडणूक रोखल्यानंतरही कुस्तीगीर आपल्या भूमिकेवर ठाम होते. आम्हाला कुस्ती महासंघाच्या निवडणुकीशी काही घेणेदेणे नाही. निवडणूक रोखावी आणि महासंघावर हंगामी समिती स्थापन करावी हा त्यांचा निर्णय झाला. अध्यक्षांच्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा आणि लैंगिक शोषण प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी व्हावी, याच आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्या कायम राहतील.

विशेषतः कुस्तीगीर या वेळी अधिक आक्रमक झाले आहेत. आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आम्हाला कुठे तरी न्याय मिळेल, असे म्हणत साक्षी मलिकने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठेवल्याचे सांगितले. दरम्यान, “क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनाला बळी पडून आम्ही तीन महिन्यांपूर्वी आंदोलन मागे घेतले ही आमची चूक झाली. त्यानंतर त्यांनी काही व्यक्तींचा उपयोग करून या सर्व परिस्थितीमध्ये फेरफार केले. आता आम्ही कुणाचे ऐकणार नाही. कुणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाही,” असे विनेश म्हणाली.

आम्ही चुकीचे आरोप करत आहोत असे असेल, तर आमच्यावर उलटा गुन्हा दाखल करावा. अध्यक्ष ब्रिजभूषण हे केंद्रात सत्ता असलेल्या भाजपचे खासदार आहेत. ते सरकारवर दबाव आणत आहेत की काय; सरकार इतके दिवस गप्प का? चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यासाठी वेळ का लागतोय? असा संतप्त सवाल या कुस्तीगीरांनी केला आहे.

दरम्यान याबाबत ट्विट करत माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी “इंसाफ के सिपाही तुमच्या सोबत आहेत,” असे म्हणत कुस्तीगीरांना पाठिंबा दर्शविला आहे.

कोण आहे बृजभूषण शरण सिंह?
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह हे यूपीच्या बहराईच जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. ते आतापर्यंत सहा वेळा लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. उत्तर भारतीयांविरोधातील भूमिकेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल टाकू देणार नाही, असे आव्हानही गतवर्षी त्यांनी दिले होते. यामुळेही ते चर्चेत होते.

हे सुद्धा वाचा: 

भारतीय कुस्ती महासंघाविरोधात कुस्तीगीरांची निदर्शने

बॉक्सिंग दिग्गज मेरी कोम करणार 5 सदस्यीय सरकारी पॅनेलचे नेतृत्व; ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांची होणार चौकशी

कुस्ती, बॉक्सिंगपटूंना हवाई दलात नोकरीच्या संधी, लवकर अर्ज करा

Wrestlers protest, Brijbhushan Singh, Supreme Court, Delhi, Wrestlers protest: Warning to file a petition in the Supreme Court against Brijbhushan Singh

Team Lay Bhari

Recent Posts

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…

26 mins ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

2 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

3 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

4 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

5 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

19 hours ago