31 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरक्राईमभारतीय कुस्ती महासंघाविरोधात कुस्तीगीरांची निदर्शने

भारतीय कुस्ती महासंघाविरोधात कुस्तीगीरांची निदर्शने

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर लैंगिक छळाचा आरोप

ऑलिम्पिकमध्ये भारताचे नाव नव्या उंचीवर नेणाऱ्या, पदक पटकावणाऱ्या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. आखाड्यात बड्या-बड्या पैलवानांना चितपट करणारे हे भारतीय कुस्तीपटू कुस्ती महासंघ आपल्या विचित्र नियमांनी त्रास देत असल्याचा आरोप करत आहेत. बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांचा आंदोलनामध्ये समावेश असून दिल्लीतील जंतरमंतरवर हे आंदोलन करण्यात आले आहे.

कुस्तीपटूंनी त्यांच्या तक्रारी किंवा मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली नाही, परंतु भारतीय कुस्ती महासंघाचे (रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया) अध्यक्ष आणि कैसरगंज भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या वर्तनामुळे नाराज असल्याचे स्पष्ट केले आहे. बजरंग, विनेश, रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती सरिता मोर, संगीता फोगट, सत्यवर्त मलिक, जितेंद्र किन्हा आणि राष्ट्रकुल पदक विजेता सुमित मलिक हे ३० कुस्तीपटू जंतर मंतरवर आंदोलनात सहभागी झाले आहेत.

बजरंग पुनिया म्हणाले, आमची ही लढाई सरकार किंवा भारतीय खेळ प्राधिकरणाच्या विरोधात नाही. आम्ही भारतीय कुस्ती महासंघ (डब्लूएफआय) च्या विरोधात आहोत. बजरंगचे प्रशिक्षक सुजित मान आणि फिजिओ आनंद दुबे यांच्यासह स्पोर्ट्स स्टाफही संपावर आहे. सिंग हे २०११ पासून डब्लूएफआयचे अध्यक्ष आहेत आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली. कुस्तीपटूंनी बॉयकॉट डब्ल्यूएफआय प्रेसिडेंट हा हॅशटॅग ट्विट करून पीएमओ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही टॅग केले आहे.

गीता फोगटची चुलत बहीण विनेश फोगट हिचाही निषेध करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. तिने ट्विट केले आहे की, खेळाडूंना सन्मान हवा असतो आणि ऑलिम्पिक व इतर मोठ्या खेळांसाठी पूर्ण जोमाने तयारी करत असतो, पण महासंघाने त्यांना साथ दिली नाही तर त्यांचे मनोबल खचते. पण आता आम्ही झुकणार नाही, आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार आहोत. याविषयी पहलवानांनी #BoycottWFIPresident #BoycottWrestlingPresident टॅग करून मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर आणि ट्विटरवर ट्विट केले आहे.

टोकियो ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने लिहिले आहे की, फेडरेशनने खेळाडूंना पाठिंबा दिला पाहिजे. त्यांच्या क्रीडाविषयक गरजांची काळजी महासंघाला घ्यावी लागते. समस्या असेल तर त्यावर उपाय शोधावा लागतो, पण महासंघानेच समस्या निर्माण केली तर काय करायचे? आता लढायचे आहे, आम्ही मागे हटणार नाही.

हे कुस्तीपटू पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर आपले म्हणणे मांडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने ट्विटरवर याबाबत टीकास्त्र सोडले आहे. तिने लिहिले आहे की, कुस्तीपटू कठोर परिश्रम करतात आणि देशासाठी पदके मिळवतात, परंतु फेडरेशनने त्यांना निराश करण्याशिवाय काहीही केले नाही. आम्हाला मान्य नसलेले नियम आणि कायदे यांच्यामुळे आमचा छळ होत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी