29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाबॉक्सिंग दिग्गज मेरी कोम करणार 5 सदस्यीय सरकारी पॅनेलचे नेतृत्व; ब्रिजभूषण यांच्यावरील...

बॉक्सिंग दिग्गज मेरी कोम करणार 5 सदस्यीय सरकारी पॅनेलचे नेतृत्व; ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांची होणार चौकशी

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करणारी पाच सदस्यीय निरीक्षण समितीचे नेतृत्व एमसी मेरी कॉम करणार आहे.

बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कॉम(MC Mary Kom)पाच सदस्यीय निरीक्षण समितीचे नेतृत्व करणार आहे. याद्वारे भारतीय कुस्ती महासंघ (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करणार आहे. त्याचप्रमाणे सरकारने नियुक्त केलेली समिती पुढील एक महिन्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाचे दैनंदिन व्यवहार चालवणार आहे.

राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या तीन दिवसांपासून भारतातील दिग्गज कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात हे आंदोलन सुरू आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगटने ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण आणि छळाचे आरोप केले आहेत. त्याच अनुषंगाने हे सर्व आंदोलक कुस्तीपटू ब्रिजभूषण यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

यातच आता, कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटूंमधील वादात भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) मोठा निर्णय घेतला आहे. आयओए ने डब्लूएफआयचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सदस्यांमध्ये मेरी कोम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि 2 वकिलांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात कुस्तीगीरांची निदर्शने

बृजभूषण शरण सिंह यांनी लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळले; बड्या उद्योगपतीचा हात असल्याचा आरोप

पुण्यात पार पडलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा अनधिकृत : कुस्तीसम्राट अस्लम काझी

पुढील एका महिन्यात ही समिती सर्व पक्षांशी बोलून लैंगिक आरोप आणि इतर आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करेल. तोपर्यंत डब्ल्यूएफआयचे सर्व दैनंदिन निर्णय आणि कामकाज या समितीद्वारे काळजी घेतली जाईल,” अशी घोषणा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गंभीर बाब असल्याने आम्ही या प्रकरणाची चौकशी करणार आहोत. आम्ही सर्व संबंधित पक्षांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ, असे आयओएने म्हटले आहे. दरम्यान, चौकशीसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. यापूर्वी क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघ आणि अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना 72 तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या वतीने जबाब नोंदवण्यात आला आहे. ब्रिजभूषण यांचा मुलगा प्रतीक भूषण सिंह याने याबाबत माहिती दिली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही नोटीस बजावली आहे. दरम्यान, ब्रिजभूषण यांनी राजीनामा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी