राजकीय

Shahajibapu Patil | Ganpatrao Deshmukh | शहाजीबापू पाटील यांच्या गावात पाणी, काय खरं, काय खोटं ?

लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी नुकताच सांगोला विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला(Activists of Shahajibapu Patil became aggressive). आमदार शहाजीबापू पाटील यांच्या चीकमहूद या गावी तुषार खरात यांनी भेट दिली. गावातील सामान्य लोकांच्या भावना जाणून घेत असताना यावेळी शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाले. आमच्याही प्रतिक्रिया घ्या, मुलाखती घ्या, असा आग्रह शहाजीबापू पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

शहाजीबापू पाटील सांगोल्यात परतले अन् म्हणाले, बोकडाचं मटण कसे ओरपायचे ते शिकवतो

यावेळी दिवंगत गणपतराव देशमुख व विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. दोन्हीही कार्यकर्ते आपापली बाजू नेटाने लावून धरत होते. यावेळी माण – खटावमधील आमदार जयकुमार गोरे यांच्या गुंडगिरीचा उल्लेख संपादक तुषार खरात यांनी केला. शहाजीबापू पाटील यांच्या गावात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते लोकशाही पद्धतीने विचार मांडत आहेत. पण माण – खटाव मतदारसंघात अशा पद्धतीने विचार मांडण्याची सोय नाही, असा उल्लेख तुषार खरात यांनी केला.

शहाजीबापू पाटील सांगोल्यात परतले अन् म्हणाले, बोकडाचं मटण कसे ओरपायचे ते शिकवतो

यावर शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते खवळले. माण – खटावच्या आमदारांविषयीचे प्रश्न त्यांच्या मतदारसंघात विचारा. आमच्या मतदारसंघात कशाला विचारता असा सवाल शहाजीबापू पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला. तर कै. गणपतराव देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार देशात कुठेही फिरू शकतात. कोणाही बद्दल प्रश्न विचारू शकतात. माण – खटाव मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातच येतो. त्यामुळे माणविषयी या ठिकाणी प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही, अशी भावना देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

शहाजी बापू पाटील यांना प्राध्यापक नरकेंनी खडे बोल सुनावले

तुषार खरात

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

2 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

6 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

8 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

9 hours ago