राजकीय

हिंदुत्वावर खेळी खेळणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंनी फटकारले

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील शिवसेना वि. शिवसेना वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. रोजच नवे आरोप – प्रत्यारोपांचे खेळ राजकीय पटलावर दिसून येत आहे. दरम्यान हिंदुत्वाच्या मुद्यावरून वर्चस्व निर्माण करू पाहणाऱ्या शिंदेगटाला आदित्य ठाकरे यांनी यावेळी चांगलेच फटकारले आहे. “फाईल्स उघडल्या गेल्यामुळे त्यांनी पक्षाविरोधात गद्दारी केली” असल्याचे म्हणत ठाकरे यांनी शिंदे गटाला धारेवर धरले आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी नुकताच संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना चांगलीच संकटात सापडली आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वेगवेगळ्या शाखांमध्ये जात कार्यकर्त्यांसोबत संवाद सत्र सुरू केले आहे.

दरम्यान, कार्यकर्त्यांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आपण दिल्लीसमोर जाऊन झुकतोय. दिल्लीकडे आपण (महाराष्ट्राच्या मदतीसाठी) काही पॅकेज मागत नाही. गुवाहटीला, सुरतेला जाऊन मजा करता याला तुम्ही बंडखोरी तरी कशी म्हणता?”, असा सवाल त्यांनी यावेळी शिंदे गटाला केला.

बंडखोरांची वेगवेगळी प्रकरणे उघड झाल्याने त्यांनी शिवसेनेविरोधात भूमिका घेतली असे सुद्धा ठाकरे यावेळी म्हणाले. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “तुमच्यावर दडपण असेल, तुमच्या काही फाईल्स उघडल्या असतील. पण घोटाळे तुम्ही करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि लपवायला कोणाच्या पाठीत खंजीर खुपसायचा तर पक्षप्रमुखांच्या”, असे म्हणून त्यांच्या वागणुकीवर त्यांनी टीका केली आहे.

“शिवसेनेशी गद्दारी करायची नंतर बोलायला मोकळे आम्ही हिंदुत्वासाठी गेलो. हे सगळं थोतांड आहे. त्यांना स्वतःला वाचवायचं होतं म्हणून त्यांनी तुमच्याबरोबर, आमच्याबरोबर गद्दारी केली”, असे कळकळीने शिवसैनिकांना सांगत आदित्य ठाकरे यांनी या बंडावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली.

हे सुद्धा वाचा…

प्राध्यापक नरकेंनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारण सोडणार ?

विदर्भात शिंदे गट शिवसेना फोडणार? ‘मिशन विदर्भ’ लवकरच सुरू

शिंदे गटाचे भविष्य आज ठरणार? खंडपीठाची आज महत्त्वपूर्ण सुनावणी

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

नाशिक, दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी कामगारांना मिळणार भरपगारी सुट्टी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी आणि 21 नाशिक लोकसभा मतदार (Nashik,…

11 mins ago

शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदी अजय बोरस्ते तर विजय करंजकर यांना मिळणार हे पद

नाशिक लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकर (Vijay Karanjkar) हे शिवसेना शिंदे…

56 mins ago

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

14 hours ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

14 hours ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

14 hours ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

14 hours ago