31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजआदित्य ठाकरे यांची सूचना, महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून...

आदित्य ठाकरे यांची सूचना, महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका

टीम लय भारी

नाशिक : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. यापार्श्वभूमीवर मास्कमुक्त महाराष्ट्राची चर्चा सुरू झाली. राज्याच्या कॅबिनेटमध्ये या विषयावर विचारविनिमय झाल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का अशा चर्चा सुरू झाल्या . यावर आता कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका(Aditya thackeray, Masks will not be abolished in Maharashtra).

मास्क हे कोरोना पासून स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यात चांगलं हत्यार असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर तुर्तास तरी महाराष्ट्र मास्कमुक्त होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे(Aaditya thackeray said, mask is the best weapon to protect yourself from the corona).

वाईनच्या सुपर मार्केटमधील निर्णयाबाबत देवेंद्र फडणवीसांकडून होणाऱ्या आरोपांना मी उत्तर देणार नाही कारण ते सध्या प्रत्येक गोष्टीवर टीका करत असतात, अशी प्रतिकिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.उत्तर प्रदेशला प्रचाराला विचारले असता गोव्यात आधी गेलो होतो. उत्तर प्रदेशचा इतिहास माहीत नाही पण मी जाणार आहे. शिवसेना म्हणून गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये लढणार आहे. प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पर्याय आहेत ते आम्ही बघू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री म्हणाले; ‘शाब्बास, दिल्लीत झेंडा फडकवलात’ !

आदित्य ठाकरे यांनी जगविख्यात अजिंठा लेण्यांना दिली भेट, पर्यटनवाढीसाठी महत्वाचे पाऊल

आदित्य ठाकरेंचा पुढाकार, मुंबईतील सहा किल्ल्यांचे भाग्य उजळणार

Mumbai’s iconic double-decker buses go electric, ‘BEST’, says Aditya Thackeray

मंत्रिमंडळाच्या बैठक मास्कमुक्त महाराष्ट्राबद्दल चर्चा झाली. कोरोना रुग्णांची घटलेली संख्या, लसीकरणात होणारी वाढ या सर्व गोष्टी लक्षात घेता मास्कमुक्तीचा निर्णय घेतला जाईल. तत्पूर्वी देशातील परिस्थिती पाहिली जाईल, तिथल्या स्थितीचा आढावा घेतला जाईल . त्यानंतर टास्क फोर्सशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच यावेळी आदित्य ठाकरे यांनी टीईटी घोटाळ्याबाबत बोलण्यास नकार दिलाय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी