राजकीय

गावच्या सोसायटीच्या निवडणुकीपासून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत; अजितदादांचा राजकीय प्रवास

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवससाजरा होत आहे. बारामतीच्या पवार कुटुंबातील शेतीमातीत रमणारा हा मोकळ्या ढाकळ्या मनाचा माणूस राज्याचे उपमुख्यमंत्रीपद एकदा नव्हे तर चौथ्यांदा सांभाळत आहेत. राज्याच्या प्रशासनापासून शेताच्या बांधापर्यंत बारीक अभ्यास असणारे अजित पवारांचा नेतृत्व घडले कसे याचा उलगडा जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी घेतलेल्या मुलाखतीतून उलगडला आहे.

अजित पवार यांचे बालपण, शिक्षण, शेती, उद्योग आणि पुढे राजकारण असा मोठा पट या मुलाखतीत अजितदादांनी सांगितला आहे. लहानपणी शाळेत असताना खेळाची आवड असल्याने चपळपणा अंगात आला क्रिकेट टिमचा कॅप्टन, खो-खो, कबड्डी असे खेळ त्यानंतर गणेशोत्सवात नेहमी पुढाकार घेणे यातूनच त्यांच्या अंगी नेतृत्त्व करण्याची कला मुरत गेली. शरद पवार यांच्या निवडणुक प्रचार देखील ते लहानपणी करत असायचे अशी जडणघडण सुरु होती. घरातील कडक शिस्त, राहण्यात निटनेटकापणा, निर्व्यसनी, आणि एखादे काम हातात घेतले की धसास लावल्याशिवाय विश्रांती घ्यायची नाही हा त्यांचा स्वभावगुण त्यांना राजकारणात देखील ‘दादा’ करुन गेला.

अजित पवार तरुणवयात शेती करत होते. शेतीबरोबरच शेतीपुरक उद्योग देखील ते सांभाळायचे पोल्ट्री फार्म, दुधाची डेयरी, असे उद्योग त्यांनी केले. त्याचबरोबर शेतात अनेकप्रकारची पिके, फळबागांची लागवड देखील ते करत असत. त्यांच्या याच काळात आसपासच्या लोकांची मदत देखील करायचे, लोकांच्या सरकारी कार्यालयातील अडीअडचणी देखील सोडवायचे. तो काळ साधारण १९८० च्या दरम्यानचा होता. याच काळात ते गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी उभे राहिले. त्यानिवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्ट झाले. हे सगळे सुरु असाताना शरद पवार यांना शरद पवार आणि राजीव गांधी यांनी त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातून खासदारकीचे तिकीट दिले. देशात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन ते खासदारकीला प्रचंड बहुमताने निवडुण आले, असल्याचे देखील अजित पवार यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले.

 

हे सुद्धा वाचा

विरोधी पक्ष नेत्याविना पार पडला पावसाळी अधिवेशनाचा आठवडा
IAS Transfers : राधाकृष्ण विखे पाटलांची इच्छा पूर्ण झाली, तुकाराम मुंढे आले सोबतीला; राज्यातील ४१ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
अतूल भातखळकरांच्या ‘त्या’ ट्विटनंतर नाना पटोले भडकले!  

त्याच काळात शरद पवार यांना संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात बोलावणे आले. त्यांनंतर अजित पवार हे राज्यात विधानसभेत आले आणि शरद पवार देशाच्या संसदेत गेले. त्यावेळचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याशी त्यावेळी झालेल्या चर्चेची देखील आठवण सांगितली. शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेल्यानंतर अजित पवार १९९१ साली दिल्लीतून महाराष्ट्राच्या राजकारणात आमदार म्हणून आले. १९९१ साली ते राज्यमंत्री मंत्री झाले. तेव्हा पासून आजतागायत ते बारामती मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत विधानसभेत निवडुण येत आहे. राज्यमंत्री, विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्री, विरोधीपक्ष नेता, राज्याचे उपमुख्यमंत्री असा त्यांचा आजवरचा राजकारणातील प्रवास झाला आहे.

 

 

प्रदीप माळी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

5 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago