राजकीय

अजितदादांमुळेच मी..; ‘त्या’ विधानानंतर अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरील चर्चेने गेल्या काही दिवसांपासून राजकरणात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. नुकतेच खासदार अमोल कोल्हेंनी एका कार्यक्रमात जयंत पाटील हे राज्याचे आदर्श मुख्यमंत्री होऊ शकतात असं विधान केले होते. त्यावरून वाद रंगत वेगवेगळ्या विषयांना पाझर फुटत आहे. मात्र मी केलेल्या विधानाचा कुठलाही वेगळा अर्थ काढू नका, मी खासदार अजित पवारांमुळेच आहे, असा खुलासा खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या आशीर्वादाने आणि ही निवडणूक तितक्याच आपुलकीने अजित पवारांनी हाताळली होती. दादांचा मुलगा एकीकडे निवडणूक लढवतोय, जेवढे लक्ष मावळकडे होते तितकेच लक्ष जातीने अजितदादांनी शिरूर लोकसभेवर ठेवले होते. अन्यथा 22 दिवसात चेहऱ्यावर निवडणूक जिंकता येत नाही. अजितदादांनी यंत्रणा राबवली. अजितदादांचा हात असल्यानेच निवडणूक जिंकलो ही वस्तूस्थिती असते असं त्यांनी सांगितले.

अजितदादा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे. दादांची प्रशासनावरील कमांड, पिंपरी चिंचवड शहरावरील प्रेम असेल. शिवसुराज्य यात्रेवेळी मला त्यांचा सहवास खूप लाभला असंही अमोल कोल्हे म्हणाले. दरम्यान, 2019 मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची अनेकजण दंतकथा सांगतात. मी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणे हे सगळं प्लॅनिंग अजितदादांचे होते, अजितदादांनी शरद पवारांना सांगून हे करवून आणले. अमोल कोल्हे खासदार मतदारसंघातील जनतेमुळे आणि अजित पवारांनी राबवलेल्या यंत्रणेमुळे आहे असंही त्यांनी म्हटलं. तसेच अजितदादा की जयंत पाटील मुख्यमंत्री हा प्रश्न असता आणि मी ते उत्तर दिले असते तर आक्षेप घेता आला असता. परंतु जयंत पाटील यांच्या कार्यक्रमात गेलो होतो. तिथे भाषणात मी ते विधान केले. त्यामुळे या विधानाचा अर्थ कुणीही वेगळा काढू नये, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : 

अमोल कोल्हे यांच्या ‘वाचाल तर वाचाल’मुळे सर्वांनाच टाकले बुचकळ्यात

राजीनाम्याचा विषय संपला, आता कामाला लागा: शरद पवार

शरद पवार यांचा निवृत्तीचा निर्णय मागे; पक्षाध्यक्षपदी कायम राहणार

Amol Kolhe on Ajit pawar; i am mp only because of ajit pawar

Team Lay Bhari

Recent Posts

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

55 mins ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

2 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

3 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

3 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

4 hours ago

पालिका कर्मचाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने खून करून गाेदापात्रात फेकले, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

शहरात खुनाचे सत्र सुरूच असून पंचवटीतील एका महापालिका कर्मचाऱ्याची (NMC employee) तीक्ष्ण हत्याराने वार करून…

4 hours ago