31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयराजीनाम्याचा विषय संपला, आता कामाला लागा: शरद पवार

राजीनाम्याचा विषय संपला, आता कामाला लागा: शरद पवार

शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्तीची निर्णय घेतला होता. तब्बल 63 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीनंतर सर्व जबाबदारीतून मुक्त होण्याचा मोठा निर्णय़ त्यांनी घेतला होता. या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत होता. राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्मान झाली. दरम्यान पवारांनी घेतलेल्या निर्णयाचा फेर विचार करावा. याकरिताही हितचिंतक, कार्यकर्ते आणि चाहत्यांनी एकमताने पवारांना आवाहन केले. देशभरातून, महाराष्ट्रातून विविध राजकिय पक्षातील कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी अध्यक्षपदाची जबाबदारी पून्हा घ्यावी अशी तीव्र मागणी देखील करण्यात आली. यावरून आता शरद पवारांनी कार्यकर्त्यांना नाराज न करता त्यांचा राजीनामा रितसर मागे घेतला आहे. पवार यांचे शनिवारी बारामतीकरांनी जल्लोषात स्वागत केले.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, बारामतीसह राज्य व देशातील लोकांच्या आशीर्वादाने मी इतके वर्षे सक्रिय राजकारण करू शकलो. राज्यसभेची अजून काही वर्षे शिल्लक आहेत. काही दिवसांपासून वाटत होते की, नव्या लोकांना संधी द्यायला पाहिजे व त्यांनीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मी बाजूला होणे, याचा अर्थ घरी बसणे असा नाही. लोकांत, कार्यकर्त्यांत राहणे, त्यांचे प्रश्न सोडविणे, हा मनाशी निश्चय करून मी अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. भाजपला पर्याय देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात आपला सहभाग असेल.

विशेषत: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पातळीवर विरोधकांची एकजूट होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यातच मी बाजूला होणे योग्य नसल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यकर्त्यांनीदेखील तीव्र भावना व्यक्त केल्या. त्या सर्व विचारात घेता मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय मागे घेतला. राजीनाम्याचा विषय संपला; कामाला लागा, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : 

शरद पवार यांचा निवृत्तीचा निर्णय मागे; पक्षाध्यक्षपदी कायम राहणार

अजित पवार यांची पहिली प्रतिक्रीया; शरद पवारांच्या निर्णयावर काय म्हणाले ?

मोठी बातमी : शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला; निवड समितीचा निर्णय

Sharad Pawar, NCP, Supriya Sule, Ajit Pawar, Sharad Pawar resignation, Sharad Pawar resignation matter is over, now get to work: NCP Sharad Pawar,

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी