31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयअमोल कोल्हे यांच्या 'वाचाल तर वाचाल'मुळे सर्वांनाच टाकले बुचकळ्यात

अमोल कोल्हे यांच्या ‘वाचाल तर वाचाल’मुळे सर्वांनाच टाकले बुचकळ्यात

एकीककडे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या भाजपसोबतच्या हातमिळवणीच्या चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर जागतिक पुस्तकदिनानिमित्त एक फोटो पोस्ट केला आहे. त्यातील एक पुस्तक हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाषणांचे नेमकेची बोलणे हे आहे, तर दुसरे पुस्तक नलिन मेहता यांचे ‘द न्यू बीजेपी’ हे आहे.

अमोल कोल्हे यांनी या पोस्टला लिहिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरु कोण? कोल्हे यांच्या या पोस्टमुळे सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. कोल्हे हे उत्तम संसदपटू असून दमदार अभिनेते म्हणून देखील त्यांची सबंध देशभरात ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या साकारलेल्या भूमिकांमुळे कोल्हे घराघरांत पोहचले आहेत. कोल्हे यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरु झाला. शिरुर मतदारसंघात अढळराव पाटील यांच्यामुळे कदाचीत संधी मिळणार नाही, असे वाटल्याने अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटात बांधून संसदेत पोहचले. त्यांच्या संसदेतील कामगिरीमुळे त्यांना दोनवेळा संसदरत्न पुरस्कारने देखील गौरविण्यात आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा माध्यमांमधून सुरु आहेत.


पिंपरी-चिंचवड पोटणीवडणुकीदरम्यान अमोल कोल्हे यांनी एका कार्यक्रमात शिट्टी मारल्याने बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचा प्रचार त्यांनी केल्याची चर्चा देखील राज्यभरात सुरु होती. कोल्हे यांच्या आजच्या पोस्टमुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टखाली अनेकांनी कमेंट केल्या असून एकाने कॉमेंट करत म्हटले आहे की, ‘आज घड्याळ उद्या कमळ परवा……?? पुढील वाटचालीस शुभेच्छा’. तर आणखी एका ट्विटरवापरकर्त्याने म्हटले आहे की, ‘डॉ. कोल्हे 2024 ला भाजपात जाणार आणि पराभूत होणार.. ट्विट सेव्ह करुन ठेवा’. तर आणखी एकाने म्हटले आहे की, ‘हे लवकरच सुरतेची स्वारी करतील असं दिसतय’, एका ट्विटरवापरकर्त्याने म्हटले आहे की, ‘तुम्हाला निवडून आणायला आम्ही कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केलं. अढळरावांचे बलाढ्य आव्हान तुम्ही आम्हा कार्यकर्त्यांच्या जीवावर पेलले आणि आता विचारधारा कोणतीपण असो असे वाक्य राहुल राहूल कलाटे यांचा प्रचार आणि पक्षाचा कार्यक्रमातून पाय घेणं हे काय आम्हा कार्यकर्त्यांना पटलेलं नाही’. तर एकाजणाने ‘भाजपा मे आपका स्वागत है’

Amol Kolhe's post on social media controversial discussion political environment

अमोल कोल्हे यांनी जागतिक पुस्तक दिनी केलेल्या पोस्टमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे, तर भाजप समर्थकांमधून मात्र आपले भाजपात स्वागत असल्याच्या पोस्ट देखील केल्या आहेत. अमोल कोल्हे यांच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय हे मात्र येणाऱ्या काळातच दिसेल. असे असले तरी अजित पवार यांच्या भाजपसोबत हातमिळवणीच्या चर्चा, त्यावर अजित पवारांनी हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले तरी चर्चा मात्र थांबायचे नाव घेत नाही, त्यातच कोल्हे यांच्याबाबत देखील गेल्या काही दिवसांपासून भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही सध्या सुरु आहे, त्यावर कार्यकर्ते मात्र बुचकळ्यात पडल्याचे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

रक्तातील नात्यांच्या गळाभेटीमुळे कैद्यांच्याही अश्रूंचा फुटला बांध..!
राजीव गांधींसारखे मोदींना बॉम्बने उडवून देऊ; पंतप्रधानांना धमकीचे पत्र
MPSC करिअरचे राजकारण; 90 हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी