राजकीय

शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला

टीम लय भारी

बीड : बीडच्या शिवसेना उपजिल्हाप्रमुखांवर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हनुमान जगताप असे जखमी उपजिल्हाप्रमुखाचे नाव आहे. जगताप यांच्यावर हा हल्ला बीड – परळी महामार्गावरील घोडका राजपुरी या परिसरात करण्यात आला होता. त्यांच्यावर सध्या बीड शहरातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे (Beed Shiv Sena Deputy District Chief Hanuman Jagtap fatally attacked).

या सर्व प्रकरणावर जवाब नोंदवताना जखमी जगताप म्हणाले की, २ दिवसांपूर्वी शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे बीडमध्ये आले होते. यावेळी मी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांची व इतर सत्ताधाऱ्यांची त्यांना तक्रार केली होती. शिवसेना जिल्हाप्रमुख पैसे कमावण्याच्या नादात पक्षाकडे लक्ष देत नाही अशी तक्रार करण्यात आल्यामुळे माझ्यावर हा हल्ला करण्यात आल्याचा संशय जगताप यांनी व्यक्त केला.

आमदार रोहित पवारांचा राम शिंदेंना ‘दे धक्का’

देवेंद्र फडणवीसांचा अनिल परब यांच्यावर आणखी एक वार

जगताप यांच्यावर हल्ला होत असताना घटनास्थळी सदाशिव किसान सानप होते. त्यांनी घटनास्थळी घडलेला सर्व प्रकार सांगितला. यामध्ये मारहाण करणारी व्यक्ती हातात तलवार घेऊन होती असे सानप म्हणाले. सानप हे जखमी जगताप यांच्यासोबत गाडीवरती होते.

नारायण राणे, कृपाशंकर सिंग या घोटाळेबाजांना भाजपची बक्षिसी; परब – गवळी यांच्यावर कारवाई

Thaw in Shiv Sena, BJP relations?

शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे जगताप यांना रुग्णालयात भेटण्यासाठी आले असता, जगताप यांच्या नातेवाईकांनी खांडे यांनीच हा हल्ला घडवून आणला असल्याचा आरोप केला आहे. मात्र खांडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच हनुमान जगताप यांच्यावर करण्यात आलेला हल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला असून आम्ही पोलीस अधीक्षकांकडे याबाबत गुन्हा दाखल करू असे जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले.

कीर्ती घाग

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

14 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

14 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

16 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

16 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

16 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

18 hours ago