33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयनारायण राणे, कृपाशंकर सिंग या घोटाळेबाजांना भाजपची बक्षिसी; परब – गवळी यांच्यावर...

नारायण राणे, कृपाशंकर सिंग या घोटाळेबाजांना भाजपची बक्षिसी; परब – गवळी यांच्यावर कारवाई

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घोटाळेबाजांची यादी तयार केली तर नारायण राणे, कृपाशंकर सिंह यांचे नाव टॉप टेनमध्ये नोंद होईल. पण या दोन्ही महाघोटाळेबाजांना भाजपने बक्षिशी दिली. नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद, तर कृपाशंकर सिंग यांना भाजपच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे (BJP rewards scammers Parab – Action against Gawli).

नारायण राणे व कृपाशंकर सिंग हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये असताना भाजपचेच नेते त्यांच्यावर जोरदार आरोप करीत होते. कृपाशंकर सिंग यांच्या मागे किरीट सोमय्या तर हात धुवून लागले होते. पण हे दोन्ही नेते भाजपमध्ये येताच त्यांना वॉशिंग मशिनमध्ये घालून स्वच्छ केले की काय असा प्रश्न उपस्थित झाला.

शिवसेना खासदाराच्या संपत्तीवर ईडीचा डल्ला

Breaking : एकनाथ खडसेंची संपत्ती ईडीने जप्त केली

विरोधी पक्षातील नेत्यांना ‘टार्गेट’ करण्याचा धंदा भाजपने सुरू केला आहे. अनिल देशमुख व प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या संपत्तीवर ईडीने धाड टाकली आहे.

निवडणूक लढविताना प्रत्येक उमेदवाराला प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागते. या प्रतिज्ञापत्रात सर्वाधिक गुन्हे भाजपच्या उमेदवारांवर दाखल आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. तो खरा वाटतो.

जेवढे काही घोटाळेबाज नेते आहेत, त्यांना आयात करण्याचा कार्यक्रम भाजपने राबविला आहे. पक्षात आलेल्या नेत्यांवर कारवाई करायची नाही. पण दुसऱ्या पक्षात असलेल्या नेत्यांच्या मागे मात्र हात धुवून लागायचे, असे सुडाचे राजकारण मोदी – शाह या जोडगोळीने सुरू केले.

ईडीचा फास एकनाथ खडसेंभोवती : जावई अटकेत

ED raids locations linked to Shiv Sena MP Bhavana Gawali in money laundering case

राधाकृष्ण विखे – पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे, प्रवीण दरेकर असे एक ना अनेक नेते भाजपने आयात केले. पण या आयात केलेल्या नेत्यांचे कांड ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांना दिसत नाहीत का, असाही सवाल सामान्य जनतेला पडला आहे (Such a question is facing the general public).

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या जणू काही भाजपच्याच संलग्न शाखा असल्यासारखे चित्र तयार झाले. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्समध्ये सनदी अधिकारी असतात. त्यांना भरपूर अधिकार असतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना देशसेवा करण्यासाठी आम्ही या क्षेत्रात येत असल्याचे ते सांगतात. प्रत्यक्षात मात्र हे सनदी अधिकारी भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागत आहेत. नितिमत्ता व देशप्रेम खुंटीला टांगून हे अधिकारी भाजपचे गुलाम झाल्याचे दिसते. हे अधिकारी विरोधी पक्षातील नेत्यांवर जशी कारवाई करीत आहेत, तशी भाजपच्या नेत्यांवरही करावी असे सामान्य जनतेला वाटते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी