34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसांचा अनिल परब यांच्यावर आणखी एक वार

देवेंद्र फडणवीसांचा अनिल परब यांच्यावर आणखी एक वार

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने दंडुका उगारला आहे, अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक दणका दिला आहे. एस टी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी येत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी या परिस्थितीचा सामना करता न आल्याने आत्महत्या केल्या आहेत. याबाबत निर्णय घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे(Suicide of ST employees, letter of Fadnavis to CM).

सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये आर्थिक मंदी असताना कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आहे, त्यातून वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. यापूर्वी जळगाव येथील वाहक मनोज चौधरी आणि रत्नागिरी येथील पांडुरंग गडदे यांनी आत्महत्या केल्या आहेत.

शिवसेना खासदाराच्या संपत्तीवर ईडीचा डल्ला

कायदेशीर सल्ला घेऊनच उत्तर पाठवले जाईल : अनिल परब

अहमदपूर, तेल्हारा, शहादा , कंधार आणि साक्री अशा अनेक ठिकाणच्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. धुळे येथील साक्री मधील कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती त्यावेळी लिहिलेल्या चिठ्ठीत ते असे म्हणाले होते, वेतन वेळेवर मिळत नाही त्यामुळे घर चालवणे कठीण होत आहे. त्यावेळी परिस्थितीचा नीट सामना करता न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आकांत केला होता, त्यांना मदत करायचे सोडून त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली होती.

Suicide
एस टी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी येत आहेत

राष्ट्रवादीचे माजी आमदार सुप्रिया सुळेंच्या समोरच भर सभेत म्हणाले, मला पक्षातून काढा

Bombay HC pulls up state, MSRTC for plight of ST bus commuters

या पात्रात देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की मुख्यमंत्र्यांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी या बाबतीत हस्तक्षेप करून योग्य ती दखल घ्यावी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी