असे असतांनाच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपमध्ये आहे, असा टोला भाजपला लगावला. दरम्यान, मलिक यांच्या या टीकेवर आता भाजप पदाधिकारी मोहित कंबोज यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हे सुद्धा वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये परिसीमन योजनेत भाजप राष्ट्रवादी आमने सामने
भाजप नेते केशव उपाध्ये यांचे शिवसेनेवर टीकास्त्र
“Know The Pain. My Father Was Killed”: BJP MP’s Reply To Rahul Gandhi
मोहित कंबोज यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ ट्विट केला असून ते म्हणाले आहेत की,नवाब मलिक रोज हर्बल टोबॅकोचा वापर करत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला आहे. या अती वापराने त्यांच्या मेंदूमधील नसांना नुकसान झाले आहे. त्यामुळेच ते या पद्धतीच्या फालतू गोष्टी बोललेत. अशी वक्तव्य एखादा संतुलन बिघडेलेला व्यक्तीच करु शकतो,’ . भाजपवर टीका करणाऱ्या मलिकयांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि ज्यांचा स्वत:चा जावई आणि घरातील व्यक्तींचा गांजा प्रकरणाशी संबंध आहे. गांजा विक्री, तस्करीशी ज्यांच्या नातेवाईकांचा संबंध आहे ते काय दुसऱ्यांकडे बोटं दाखवत आहेत.अशी टीका कंबोज यांनी केली आहे.
दरम्यान, ‘भाजप वाईन निर्णयाला विरोध करत आहे, मात्र अगोदर शिवराज सरकारने, गोवा, हिमाचल प्रदेश सरकारने असाच निर्णय घेतला होता की नाही हे भाजपने सांगावे. भाजप त्यांच्या नेत्यांचे दारू बनवण्याचे परवाने परत करणार का हा आमचा प्रश्न आहे. तसेच अनेक नेते मद्यही बनवत आहेत. अनेकांची तर मद्य विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे सर्वाधिक दारू पिणारे लोकं हे भाजपात आहेत. त्यामुळे आजपासून दारू पिणार नाही अशी शपथ भाजप नेत्यांनी घ्यावी’, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…