31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयहर्बल तंबाखूने नवाब मलिक यांच्या डोक्यातील नसा डॅमेज केल्याचे दिसत आहे ,भाजप...

हर्बल तंबाखूने नवाब मलिक यांच्या डोक्यातील नसा डॅमेज केल्याचे दिसत आहे ,भाजप नेत्याची टिका

टीम लय भारी

मुंबई:- महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.( BJP leader criticizes Nawab Malik)

असे असतांनाच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपमध्ये आहे, असा टोला भाजपला लगावला. दरम्यान, मलिक यांच्या या टीकेवर आता भाजप पदाधिकारी मोहित कंबोज यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हे सुद्धा वाचा

परमबीरसिंग यांचा ईडीकडे धक्कादायक दावा, वाझेला पुन्हा कामावर घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव-आदित्य यांचे निर्देश

पिंपरी-चिंचवडमध्ये परिसीमन योजनेत भाजप राष्ट्रवादी आमने सामने

भाजप नेते केशव उपाध्ये यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

“Know The Pain. My Father Was Killed”: BJP MP’s Reply To Rahul Gandhi

मोहित कंबोज यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ ट्विट केला असून ते म्हणाले आहेत की,नवाब मलिक रोज हर्बल टोबॅकोचा वापर करत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला आहे. या अती वापराने त्यांच्या मेंदूमधील नसांना नुकसान झाले आहे. त्यामुळेच ते या पद्धतीच्या फालतू गोष्टी बोललेत. अशी वक्तव्य एखादा संतुलन बिघडेलेला व्यक्तीच करु शकतो,’ . भाजपवर टीका करणाऱ्या मलिकयांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि ज्यांचा स्वत:चा जावई आणि घरातील व्यक्तींचा गांजा प्रकरणाशी संबंध आहे. गांजा विक्री, तस्करीशी ज्यांच्या नातेवाईकांचा संबंध आहे ते काय दुसऱ्यांकडे बोटं दाखवत आहेत.अशी टीका कंबोज यांनी केली आहे.

दरम्यान, ‘भाजप वाईन निर्णयाला विरोध करत आहे, मात्र अगोदर शिवराज सरकारने, गोवा, हिमाचल प्रदेश सरकारने असाच निर्णय घेतला होता की नाही हे भाजपने सांगावे. भाजप त्यांच्या नेत्यांचे दारू बनवण्याचे परवाने परत करणार का हा आमचा प्रश्न आहे. तसेच अनेक नेते मद्यही बनवत आहेत. अनेकांची तर मद्य विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे सर्वाधिक दारू पिणारे लोकं हे भाजपात आहेत.  त्यामुळे आजपासून दारू पिणार नाही अशी शपथ भाजप नेत्यांनी घ्यावी’, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी