राजकीय

केवळ बोटावर मोजण्याएवढ्या भाजपाच्या व्यापारी संघटनांचा महाराष्ट्र बंदला विरोध – राष्ट्रवादी काँग्रेस

टीम लय भारी

मुंबई: राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने (Maha vikas aghadi) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (lakhimpur violence) येथे चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. लखीमपूर खेरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार शेतकरी होते. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे देखील या बंदमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला (BJP trade unions oppose the Maharashtra bandh).

“लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाद्वारे शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्र बंदमध्ये लोक सहभागी होत आहेत. जनतेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे आणि या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तात्काळ काढून टाकले पाहिजे ही आमची मागणी आहे.

हे तर भाजपाकडून शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन; जयंत पाटलांचा निशाणा

मोहन भागवतांचं ड्रग्ज प्रकरणांवर मोठं विधान, म्हणाले…

आम्ही सर्व व्यापारी संघटनांचे आभार मानतो की त्यांनी दुकाने बंद ठेवण्याची भूमिका स्विकारली. विनाकारण कोणालाही त्रास होऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. हिंसेचे समर्थन होणार नाही. कुठलेही नुकसान करायचे नाही. शांततापूर्वक पद्धतीने हे आंदोलन पुढे घेऊन जायचे आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

“सुरुवातीपासून गुन्हा दाखल करावा हीच आमची मागणी आहे. सुरुवातीला गुन्हा दाखल होत नव्हता. त्यानंतर दबाव निर्माण झाल्यनंतर अटक झालेली आहे. जो पर्यंत गृहराज्यमंत्री त्या पदावर आहेत या प्रकरणात तपास होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांचा राजीनामा गरजेचा आहे,” असे नवाब मलिक म्हणाले.

महाराष्ट्र बंदवरून आशिष शेलारांची राज्य सरकारवर टीका

Lakhimpur violence: Maharashtra bandh begins; BJP, MNS question MVA govt.’s double-standards

पुणे आणि नागपूरमध्ये व्यापाऱ्यांनी बंदला विरोध केला आहे,असा प्रश्न विचारल्या नंतर नवाब मलिकांनी भाष्य केले आहे. “केवळ बोटावर मोजण्याएवढ्या भाजपाच्या व्यापारी संघटनांचा विरोध आहे. सगळ्या मोठ्या संघटनांनी बंदला समर्थन दिले आहे. राज्यभर दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक सेवा अडवण्यात आलेल्या नाहीत. भाजपाला विरोध करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिल्याने तो यशस्वी झालेला आहे,” असे नवाब मलिक म्हणाले.

कीर्ती घाग

Recent Posts

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

6 mins ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

17 mins ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

32 mins ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

52 mins ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

13 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

14 hours ago