राजकीय

हे तर भाजपाकडून शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन; जयंत पाटलांचा निशाणा

टीम लय भारी

मुंबई: राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लखीमपूरमधील हत्याकांडाच्या विरोधातील महाराष्ट्र बंदला विरोध करणाऱ्या भाजपावर सडकून टीका केलीय. लखीमपूरमधील हत्याकांडाची तुलना केवळ जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल. या बंदला विरोध म्हणजे भाजपाकडून शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन आहे, असंही मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. ते मुंबईतील बंदमध्ये सहभागी झाले असताना बोलत होते (Jayant Patil criticizes BJP over Maharashtra bandh).

” लखीमपूरसारखी घटना म्हणजे जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड

जयंत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. या बंदचं कारण म्हणजे भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. भाजपला त्यांचं राजकीय मत आग्रहाने मांडायचं आहे हे समजू शकतोपण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे.

मंत्री जयंत पाटील यांचा विनम्रपणा, सामान्य लोकांच्या भेटीसाठी विधानभवनातून आले रस्त्यावर !

मोहन भागवतांचं ड्रग्ज प्रकरणांवर मोठं विधान, म्हणाले…

लखीमपूर हत्याकांडाचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल

भाजपाच्या मंत्र्यांच्या चिरंजीवांनी हे हत्याकांड केलंय. अद्यापही त्याला अटक होत नाहीत्याला सन्मानाने बोलावलं जातं. भाजपाला शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचं काम करायचं आहे. त्याचा निषेध म्हणून मविआच्या सर्वच पक्षांनी हा बंद पुकारला आहे. लखीमपूर हत्याकांडाची जालीयनवाला बाग हत्याकांडाशीच तुलना होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

महाराष्ट्र बंदवरून आशिष शेलारांची राज्य सरकारवर टीका

BJP trying to defame NCP leaders: Jayant Patil on I-T raids against Maharashtra Deputy CM Ajit Pawar’s family

भाजपा महाराष्ट्र बंदला विरोध करून लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांचं जे हत्याकांड झालंशेतकऱ्यांना चिरडून मारलं त्याचं अप्रत्यक्ष समर्थन करत आहे. भाजपच्या शेतकरी विरोधी गोष्टींना सर्वच स्तरातून विरोध होतोय. आम्ही बंद कुणावरही लादत नाहीये. त्यामुळे बहुतेक ठिकाणी लोकच यात सहभागी झालेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

कीर्ती घाग

Recent Posts

नाशिक शरणपूर येथे ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी…

5 mins ago

पंकजा मुंडेंची लढाई जातीयवादाच्या पेचात

बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण…

32 mins ago

४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde)…

33 mins ago

नाशिक इंदिरानगर येथे वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिन्यांची चोरी

इंदिरानगरमध्ये (Indiranagar) चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये (washing machine) लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने (Jewellery…

1 hour ago

३० मेपर्यंत खोदलेले रस्ते दुरुस्ती न झाल्यास महापालिका नेमकी कोणावर कारवाई करणार?

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याच्या प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले (roads…

2 hours ago

दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक (State Director of Archaeology) संशयित डॉ. तेजस मदन गर्गे…

2 hours ago