30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयमोहन भागवतांचं ड्रग्ज प्रकरणांवर मोठं विधान, म्हणाले…

मोहन भागवतांचं ड्रग्ज प्रकरणांवर मोठं विधान, म्हणाले…

टीम लय भारी

उत्तराखंड : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत आहे. याचा जामीन अर्ज मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी फेटाळला. आर्यनच्या जामीन अर्जावर महानगरदंडाधिकारी सुनावणी घेऊन निर्णय देऊ शकत नसल्याचे न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळताना नमूद केले (Mohan Bhagwat’s big statement on drug cases).

आर्यन खानच्या अटकेमुळे पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्जचा वापर यासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय देशात अनेक ठिकाणी ड्रग्ज सापडत असून सरसंघचालक मोहन भागवत यांनी यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. ते उत्तराखंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

आर्यन खानसह आठ जणांच्या जामीनावर आज फैसला!

आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण बनावट, नवाब मलिक यांनी एनसीबीचे पितळ उघडे पाडले

मोहन भागवत यांनी यावेळी भारतीय कुटुंबव्यवस्थेचं महत्त्व समजावून सांगताना पाश्चिमात्य देशही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास करत होते असं सांगितलं. तसंच ही मूल्यं नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप केला. “लोकांना आपलं गुलाम बनवण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी चीनमध्ये ओपियम पाठवलं. तरुण त्याच्या आहारी गेले आणि पाश्चिमात्य देशांनी चीनवर राज्य केलं. आपल्या देशातही हेच सुरु आहे. जेव्हा तुम्ही ड्रग्ज प्रकरणं पाहता आणि ते कुठून येतात हे पाहिलंत तर ते का, कशासाठी येत आहेत आणि याचा कोणाला फायदा होत आहे हे तुम्हाला समजेल,” असं मोहन भागवत म्हणाले आहेत.

हृतिक रोशन याने लिहिली आर्यन खानसाठी खास पोस्ट

‘Owaisi Was My Childhood Friend, Mohan Bhagwat Shakuni Mama’: MP Man Recalls Past Life

अटकेनंतर लगेच भाजपा नेत्याच्या नातेवाईकाची सुटका – नवाब मलिक

अमली पदार्थ प्रकरणात १० जाणांना अटक करण्यात आली होती, परंतु त्यापैकी दोघांना काही तासांनंतर लगेच सोडून देण्यात आले, त्यात भाजपा नेत्याच्या एका नातेवाईकाचा समावेश होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी (एनसीबी) पथकाच्या अधिकाऱ्यांवर केला. भाजपाचा कोण नेता आहे त्याचे नाव नंतर जाहीर करणार आहे, असे मलिक म्हणाले.

मोहन भागवतांचं ड्रग्ज प्रकरणांवर मोठं विधान, म्हणाले…

न्यायालयाकडे मागणी…

मी यापूर्वी कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा केलेला नाही. एका प्रतिष्ठित कुटुंबातून असून माझे आईवडील आणि भावंडे मुंबईतच राहतात. माझ्याकडे भारतीय पारपत्रही आहे. त्यामुळे फरारी होणार नाही, शिवाय पुरावे नष्ट करण्याचा प्रश्नच नाही. या प्रकरणी एनसीबी इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा केले असून या सगळ्यांचा विचार करून जामीन देण्याची विनंती आर्यनच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी