राजकीय

शिंदे सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून, फडणवीस सादर करणार अर्थसंकल्प!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. २७ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ९ तारखेला अर्थसंल्प सादर करतील. चार आठवडे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे. महागाईचा निर्देशांक सतत वाढत असून मध्यमवर्गीयांना घर खर्च भागविताना दमछाक होत आहे. तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे. राज्याच्या तिजोरीतील महसूल आणि खर्च यांचा ताळमेळ बसविणे सरकारला कठीण होत चालले आहे. राज्यासमोर अशा अनेक समस्या उभ्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारच्या याअर्थसंकल्पाकडे सर्वसामान्यांचे लक्ष बाळगून राहिले आहे. (Budget session of Shinde government from February 27, Fadnavis will present the budget!)

राज्य विधिमंडळ कामकाज समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात पार पडली. या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आदी उपस्थित होते. मंत्रिमंडळाचा विस्तार राखडल्यामुळे मंत्र्यांच्या संख्येअभावी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याआधी मंत्र्यांचे नाव प्राधिकृत करावे लागते. याच कारणास्तव विधान परिषदेतसुद्धा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी एका मंत्र्याला प्राधिकृत करावे लागणार आहे. यासाठी सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई या मंत्र्यांची नवे चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.

प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिवेशन पाच आठवडे घ्यावे
हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती. पण ती मंजूर करण्यात आली नव्हती. त्यामुळे राज्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन पाच आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

अदानीवरून राहुल गांधींचे पंतप्रधानांना 7 प्रश्न; मोदी सरकारची कोंडी!

रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पत्रकाराची राजापुरात हत्या ; पोलिसांनी आरोपी आंबेरकरच्या मुसक्या आवळल्या

हिंदुत्ववाद्यांच्या मैदानात राहुल गांधींनी केले नरेंद्र मोदींना चीतपट!

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

13 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

14 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

14 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

17 hours ago