29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeक्राईमरिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पत्रकाराची राजापुरात हत्या ; पोलिसांनी आरोपी आंबेरकरच्या मुसक्या...

रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पत्रकाराची राजापुरात हत्या ; पोलिसांनी आरोपी आंबेरकरच्या मुसक्या आवळल्या

कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शशिकांत वारीशे या पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध बातम्या छापून आणल्यामुळे त्याने सोमवारी वारीशे यांना एसयूव्ही गाडीखाली चिरडले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वारीशे हे स्थानिक मराठी वृत्तपत्रात काम करत होते. त्यांच्या मागे त्यांची आई, पत्नी आणि १९ वर्षांचा मुलगा आहे. बरसू येथे उभारण्यात येणाऱ्या ‘रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ विरोधात ते वृत्तांकन करीत होते. या कारणास्तव काही स्थानिक लोकांचा त्यांच्यावर रोष होता. (Journalist opposing refinery project killed in Rajapur; The police arrested the accused Amberkar)

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, ही घटना घडल्यानंतर काही वेळातच आरोपीला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजार करण्यात आल्यानंतर १४ फेब्रुवारीपर्यंत आंबेरकर याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच आम्ही त्वरित कारवाई केली. संध्याकाळपर्यंत आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजार करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपस सुरु आहे, असे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

Journalist opposing refinery project killed in Rajapur; The police arrested the accused Amberkar

पत्रकाराला गाडीखाली चिरडले
सोमवारी वारीशे राजापूर महामार्गानजीकच्या पट्रोल पंपावर उभे होते. त्यावेळी पंढरीनाथ आंबेरकर याने त्याच्या एसयूव्ही गाडीने धडक देत वाराशे यांना कित्येक मीटरपर्यंत फरफटत नेले. ही हत्या होत असताना काही स्थानिक लोक वारीशे यांच्या मदतीसाठी धावले पण आंबेरकरने घटनास्थळावरून पळ काढला. त्यावेळी वारीशे बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडले होते. उपचारासाठी त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

Journalist opposing refinery project killed in Rajapur; The police arrested the accused Amberkar

भूमाफियांनी केली हत्या !
उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत यांनी वारीशे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आपण संसदेत मुद्दा उपस्थित करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पात्र लिहिणार असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. ते म्हणाले,’हा अपघात नसून यामागे हत्येचे षडयंत्र आहे. जमिनीच्या दलालांनी हा हल्ला घडवून आणली आहे. याबाबत मी पंतप्रधानांना पत्र लिहिणार असून रिफायनरीच्या विषयावर चर्चा करण्याची मागणी करणार आहे.’
सार्वजनिक क्षेत्रातील ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ आणि ‘हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ या तीन मोठ्या कंपन्यांमार्फत हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध आहे.

हे सुद्धा वाचा

हिंदुत्ववाद्यांच्या मैदानात राहुल गांधींनी केले नरेंद्र मोदींना चीतपट!

RBI Repo Rate Hike : नव्या वर्षात आरबीआयचा दणका; पुन्हा वाढवले व्याजदर

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष : जिल्हाधिकारी निधी चौधरी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी