राजकीय

बाबरीच्या नव्या वादाला तोंड; चंद्रकांत पाटीलांच्या खळबळजनक वक्तव्याने बाळासाहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

राज्यात बाबरीच्या नव्या वादाला तोंड फुटले आहे. चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य करत बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभारले आहे. बाबरी आम्ही पाडली, असे छातीठोकपणे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या दाव्यावर त्यांच्या पश्चात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रश्नचिन्ह उभे केले आहे. बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य त्यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून भाजपविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आक्रमक झालेत.

अयोध्येतील बाबरी मशीद पाडली, तेव्हा बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते की शिवसेना तिथे गेली होती? कारसेवक हे हिंदू होते. ते बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते, असे विधान करून वादाची राळ उडवून देणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून राजकीय- आरोप प्रत्यारोपांची झाडाझडती होत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, 6 डिसेंबर 1992 रोजी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने बाबरी मशीद पाडली. बाबरी मशिदीचा ढाचा शिवसैनिकांनी पाडला नाही. ती कारसेवकांनी पाडली. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतो म्हणाले. म्हणजे काय? त्यांनी चार सरदार तरी पाठवले का, असा सवालही त्यांनी या मुलाखतीत केला.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने मला तिथे ठेवले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद आमच्या पाठिशी होती. मात्र, ते यात उघडपणे सहभागी नव्हते. त्यांनी समविचारी संघटनांना हे काम वाटून दिले होते. संजय संजय राऊत बाबरी मशीद पाडल्याबद्दल बोलतात. मात्र, ते त्यावेळी अयोध्येत तर होते का?, असा सवालही त्यांनी केला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेतही पाटील यांनी बाबरी पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नसल्याचा दावा केला.

या व्यक्तव्याचा निषेध करत, जेव्हा बाबरी पडली, तेव्हा हे सगळे ‘उंदीर बिळा’त लपले होते, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. मनसेनेही ट्वीट करत पाटील यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. जोरदार टीका सुरू झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले. त्यानंतर पाटील यांनी बाजू मांडत ते वक्तव्य बाळासाहेबांबाबत नसून संजय राऊत यांच्याबद्दल होते, अशी सारवासारव केली. बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईत हिंदू जिवंत आहेत. बाबरी पडली, तेव्हा तेथे शिवसैनिक होतेच, पण भाजप किंवा शिवसेना पक्ष म्हणून ती पाडली गेली नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा: 

बाबरी मशीद वादावरून अयोध्येत कडेकोट बंदोबस्त

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष

एकनाथ शिंदेंना तरुणाने सुनावले, तुम्ही एकतर छत्रपतींचे होऊ शकता किंवा सावरकरांचे!

chandrakant patil, babri masjid, shiv sena, Balasaheb Thackeray, chandrakant patil on babri masjid demolition slam shiv sena Balasaheb Thackeray

Team Lay Bhari

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

5 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

6 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

9 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

9 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

9 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

10 hours ago