36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदेंना तरुणाने सुनावले, तुम्ही एकतर छत्रपतींचे होऊ शकता किंवा सावरकरांचे!

एकनाथ शिंदेंना तरुणाने सुनावले, तुम्ही एकतर छत्रपतींचे होऊ शकता किंवा सावरकरांचे!

सावरकर संभाजी महाराज यांच्याबद्दल त्यांच्या पुस्तकात अपशब्द वापरतात, ते पाहून आपला जीव का गुदमरत नाही, असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला गेला आहे. तुम्ही एकतर छत्रपतींचे होऊ शकता किंवा सावरकरांचे.. दोघांनाही मानत असाल तर ती स्वतःची फसवणूक करत असेल ... कुठली तरी एक बाजू निवडा," असे मुख्यमंत्र्यांना फेसबुक वॉलवर सुनावले गेले आहे. 

तुम्ही एकतर छत्रपतींचे होऊ शकता किंवा सावरकरांचे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तरुणाने सुनावले आहे. शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर “आम्ही सारे सावरकर” अशी प्रोफाईल व कव्हरफोटो बदलल्यानंतर त्यांना त्यांच्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे सुनावण्यात आले आहे. सावरकर यात्रा काढण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर यात्रा काढा, असे सल्लेही एकनाथ शिंदेंना त्यांच्याच अधिकृत सोशल वॉलवर देण्यात आले आहेत. सावरकर संभाजी महाराज यांच्याबद्दल त्यांच्या पुस्तकात अपशब्द वापरतात, ते पाहून आपला जीव का गुदमरत नाही, असा सवाल सचिन हिवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

शिवराज जोगदंड पाटील या तरुणाने शिंदेंना सुनावले, की तुम्ही एकतर छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानू शकता किंवा सावरकरांना..! “सावरकरांना महाराजांचे स्वराज्य हे काकतालिय न्यायाने मिळालेले वाटत होते. म्हणजे कावळा बसायला अन् फांदी तुटायला एकच वेळ व्हावी… अशा योगायोगाने मिळालेले वाटत होते. शिवाय परस्त्रीचा सन्मान करणे, मग ती शत्रूच्या घरातली का असेना … हे जे छत्रपतींचे संस्कार होते, ते सावरकरांच्या मते “सद्गुण विकृती” होते. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य किंवा त्यांचं व्यक्तिमत्त्व यापैकी काहीच सावरकरांना चांगलं वाटलं नाही. त्यांच्या दृष्टीने आदर्श राजा होता पुष्यमित्र शृंग. असं असल्याने… तुम्ही एकतर छत्रपतींचे होऊ शकता किंवा सावरकरांचे.. दोघांनाही मानत असाल तर ती स्वतःची फसवणूक करत असेल … कुठली तरी एक बाजू निवडा,” असे शिवराज पाटील याने मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक वॉलवर सुनावले आहे. 🚩जय शिवराय 🚩 असे म्हणून त्याने पोस्टचा शेवट केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या "आम्ही सारे सावरकर" या भूमिकेला उत्तर देताना दिलीप डाळिंबकर यांनी म्हटले आहे, "आम्ही सारे, शिव-फुले-शाहू-आंबेडकर!"
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या “आम्ही सारे सावरकर” या भूमिकेला उत्तर देताना दिलीप डाळिंबकर यांनी म्हटले आहे, “आम्ही सारे, शिव-फुले-शाहू-आंबेडकर!”

नांदेड दक्षिण नावाचा युझर म्हणतो, “किती स्वार्थी हिंदुत्व, सावरकरांचा अपमान झाला म्हणून पूर्ण गल्लीपासून दिल्ली पेटून उठली; पण अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्यावेळी भाजपच्या प्रतिनिधी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अपमान केला, तेव्हा ना भाजप ना शिंदे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले, ना सोशल मिडीयावर निषेध केला, शोकांतिका आहे…”

 

मयूर निकम म्हणतो, “एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला एवढा सावरकरांचा पुळका येतोय हे बघून अतिशय दुःख वाटते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या आपमान होत होता, त्या वेळी कुठल्या xxत जाऊन बसला होतात?”

तुम्ही एकतर छत्रपती शिवाजी महाराजांचे फॅन असू शकता किंवा सावरकरांचे, सावरकरांना महाराजांचे स्वराज्य हे काकतालिय न्यायाने मिळालेले (म्हणजे कावळा बसायला अन् फांदी तुटायला एकच वेळ व्हावी, अश्या योगायोगाने मिळालेले) वाटत होते.
शिवाय परस्त्रीचा सन्मान करणे, मग ती शत्रूच्या घरातली का… pic.twitter.com/6kXBxmMeUG

— Dr Amar Jadhao | ✋ (@AmarJadhao) March 28, 2023

अमर जाधव एका स्वतंत्र ट्विटमध्ये म्हणतात, “तुम्ही एकतर छत्रपतींचे होऊ शकता किंवा सावरकरांचे.. दोघांनाही मानत असाल तर तुम्ही एकतर गाढव असाल किंवा स्वतःची फसवणूक करत असाल. कुठलीतरी एक बाजू निवडा..”


श्रीकृष्णा कपूर म्हणतात, “सावरकरांना शोभेल असे वागले का? आज सावरकर असते तर सुरत ला येऊन फटके दिले असते…. 🚩🚩”

 

राम पाटील म्हणतात, “सर्व बारा भानगडी जाऊ द्या, आता महाराष्ट्रातील अवकाळी पावसामध्ये जे नुकसान झालेलं आहे, त्याची पाहणी मुख्यमंत्री साहेबांनी बांधावर जाऊन करायला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. उगाच राजकारण करत नका बसू, जरा महाराष्ट्राचं पण बघा. जय महाराष्ट्र!”

लक्ष्मण तांबडे म्हणतात, “शेतकऱ्याच्या मालाला भाऊ नाही. आज कापसाला 7,500 रुपये भाव आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे अनेक स्थानिक प्रश्न आहेत, तुम्ही ते प्रश्न सोडवायचे सोडून राजकारणाला वेगळेच वळण देत आहात. तुम्ही थोडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष द्या.”

निलेश चव्हाण म्हणतात, “सावरकर यात्रा काढा की गोळवलकर यात्रा, खोकेबहाद्दर ते खोकेबहाद्दर!”

श्याम कबले पाटील म्हणतात, “इथं सावरकर यात्रा काढण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर यात्रा काढा त्यांची दुःख बघा त्यांना सावरण्याचा प्रयत्न करा. त्यांनी काय केलं काय नाय हा इतिहास झाला, तो सांगण्यासाठी इतिहासकार आहेत. तुम्हाला निवडून राज्याचा विकास करण्यासाठी दिलं आहे, तिकडे थोडं लक्ष द्या. असल्या यात्रा करण्याने सामान्य लोकांच्या घरच्या चुली पेटणार नाहीत; पण यात्रा काढण्यासाठी मात्र कोट्यावधी रुपये खर्च मात्र होणार..” श्याम पाटील यांनी जनतेलाही सल्ला दिला आहे. “सामान्य जनतेने थोडं लक्षात घेतलं पाहिजे, ही यात्रा दारावर आली ना, की यांना फक्त विकास, रोजगार, शिक्षण, महागाई यावरच प्रश्न विचारायचे,” असे त्यांनी सुचविले आहे.

 

नवनाथ विठ्ठल चव्हाण म्हणतात, “केलीच का शेवटी पुरोगाम्यांची नक्कल? 🤦 ‘आम्ही सारे दाभोलकर’ची केली नक्कल कधीतरी स्वतंत्र बुद्धी असल्याचा संशय यावा इतकी तरी कल्पकता दाखवा…”

हे सुद्धा वाचा : 

सावरकरांनी शिवरायांची नेमकी काय बदनामी केली ?

जाती-धर्माच्या नावे विभाजन करणारे सावरकर, गोळवलकर, हेडगेवार, देवरस, मोदी हे आऊटडेटेड; छत्रपती शिवराय तर आजही आदर्श!

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीचा शिंदे सरकारला विसर

“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे “सावरकर” हे महाराष्ट्राचे कधीही आदर्श प्रेरणास्थान होऊ शकत नाही,” असे विनायक चांदगुडे यांनी म्हटले आहे.

राकेश साळुंखे म्हणतात, “छत्रपती असतील किंव्हा महात्मा फुले असतील, यांचा अवमान झाल्यावर स्वतःची साधी भूमिका स्पष्ट केली नव्हती, पण आज इतका बदल?? हा बदल येणाऱ्या निवडणुकीत जनता लक्षात ठेवेल!”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पोस्ट आणि त्यावरील सर्व प्रतिक्रिया इथे क्लिक करून वाचा  
You can either be Chhatrapatis or Savarkars Shivpremi youth told Eknath Shinde

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी