28 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरराष्ट्रीयबाबरी मशीद वादावरून अयोध्येत कडेकोट बंदोबस्त

बाबरी मशीद वादावरून अयोध्येत कडेकोट बंदोबस्त

6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडल्याच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील अयोध्येत हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. केवळ अयोध्येतच नाही तर मथुरेतही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडल्याच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील अयोध्येत हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. केवळ अयोध्येतच नाही तर मथुरेतही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कडेकोट बंदोबस्तात ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात आहे. सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानिमित्ताने परिसरात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यास पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. बाहेरून येणारी वाहने आणि लोकांचीही तपासणी केली जात आहे. मथुराचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गौरव ग्रोवर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना संपूर्ण मथुरेत सुरक्षेबाबत प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

हिंदूत्ववादी संघटनांवरही पोलिसांचे विशेष लक्ष
हिंदू संघटनांवरही पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. दोन्ही मंदिरांच्या 300 मीटर परिसरात तयार करण्यात आलेल्या रेड झोनमध्ये येणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यात येत आहे. सर्व संघटनांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, अखिल भारत हिंदू महासभेने आज मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी-इदगाह संकुलात लाडू गोपाळाचा जलाभिषेक आणि हनुमान चालीसा वाचण्याची परवानगी मागितली आहे. या पार्श्वभूमीवर मथुरा प्रशासनाने जिल्ह्यात कलम 144 लागू केले आहे. या अंतर्गत एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांना सभा, धरणे किंवा कोणत्याही निदर्शनासाठी एकत्र येण्याची परवानगी नाही.

हे सुद्धा वाचा

कर्नाटक सीमा भागाचा दौरा करायचा की नाही हे मुख्यमंत्री ठरवतील, फडणवीसांचे वक्तव्य

शिवसेना : संघर्षातून मजबुतीकडे! (आमदार प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांचा विशेष लेख)

इडा पिडा टळू दे आणि बळीराजाचं राज्य येऊ दे …! (माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा विशेष लेख)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वाद मिटला
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्या वाद मिटला आहे. रामजन्मभूमी संकुल राम मंदिराच्या उभारणीसाठी देण्यात आले. मशिदीच्या बांधकामासाठी अयोध्या जिल्ह्यातीलच सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्यात आली आहे. राम मंदिर ट्रस्टच्या वतीने रामजन्मभूमी संकुलात बांधकाम सुरू आहे.

दरम्यान, हा वाद मिटला आहे असे वाटत असले तरीही याप्रकराच धार्मिक वाद उफाळून येण्यासाठी काही विशेष कारणाची आवश्यकता नसते. अगदी छोट्याशा गोष्टीवरून देखील असे वाद पुन्हा भडकू शकतात. शिवाय दोन्ही बाजूच्या काही धार्मिक संघटना अशा विशेष दिवशी काही शांतता भंग करण्याचे काम करत असतात. अशा परिस्थितीत पोलिसांनी पुर्वतयारी म्हणून 6 डिसेंबर रोजी अयोध्येत चोख बंदोबस्त लावल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी