31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयचंद्रकांत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, भाजप - मनसेचे मैत्रीपर्व सुरू

चंद्रकांत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, भाजप – मनसेचे मैत्रीपर्व सुरू

टीम लय भारी

मुंबई :-   भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवार (ता.6) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चांना उधाण आले आहे. परंतु या भेटीनंतर चंद्रकांत पाटलांनी भाजप-मनसे युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे (Chandrakant Patil met Raj Thackeray).

या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. या भेटीत आमची राजकीय चर्चा झाली. पण मनसे-भाजपच्या युतीचा या भेटीत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. तसेच युतीवर चर्चाही झाली नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

चोर चोर मावसभाऊ, अर्ध अर्ध वाटून खाऊ : सदाभाऊ खोत

SBI खातेदारांसाठी महत्वाची बातमी; ‘बँकेने घेतला मोठा निर्णय!

चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यावर माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ही सदिच्छा भेट असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी माध्यमाच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. राज ठाकरे यांच्यासोबत नाशिकमध्ये अचानक भेट झाली. दोघेही प्रवासात होतो. त्यावेळी त्यांनी मुंबईत घरी येण्याचे निमंत्रण दिले. चहा प्यायला बोलावले होते. त्यामुळे मी त्यांना आज भेटलो. त्यांना प्रदेश कार्यालयात का नाही बोलावलं? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण मी अहंकार मानणारा नाही. त्यांनी घरी बोलावले म्हणून गेलो. त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि आलो. या भेटीत राजकीय चर्चा झाली. परंतु, भाजप आणि मनसे युतीचा कोणताही प्रस्ताव या बैठकीत नव्हता. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचे विचार सांगणे हा या बैठकीचा विषय होता, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले (This was the topic of the meeting, said Chandrakant Patil).

Chandrakant Patil met Raj Thackeray
चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे

जितेंद्र आव्हाडांनी दिली खुषखबर, सर्वसामान्यांसाठी 8,205 घरांची सोडत

Maharashtra: Chandrakant Patil meets Raj Thackeray, triggers talks of BJP-MNS alliance ahead of BMC polls

नाशिकमध्ये भेटीचे ठरले होते

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील नाशिकमधील भेट बऱ्याच प्रयत्नानंतर घडून आली होती. दोन्ही नेते पार्किंग लॉटमध्ये 15 मिनिटे बोलत उभे होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या भेटीचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला होता. राज ठाकरे यांनी मला सांगितले की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपऱ्यास झाला. त्याची लिंकही ते मला पाठवणार आहेत. आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठे नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

Chandrakant Patil met Raj Thackeray
चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंची नाशिक भेट

तुम्ही काही तरी सांगत होता आणि राज ठाकरे ऐकत होते. त्यांना नेमके काय सांगत होता? असा सवाल चंद्रकांतदादांना करताच ते फक्त हसले. बरेच दिवस झाले भेटलो नाही, असे मी त्यांना म्हणत होतो. ते म्हणाले, मुंबईत कधी येतोस. आता पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाणार आहे. मुंबईत भेटतो त्यांना. आम्ही विद्यार्थी चळवळीत होतो. 40-42 वर्षापासूनची आमची मैत्री आहे. त्यानंतर भेट झाली नाही. आम्ही नाशिकमध्ये असूनही आमची भेट झाली नव्हती. परंतु आज मुंबईत असल्यामुळे आज आमची भेट झाली. तासभर भेटलेच पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते (This was also said by Chandrakant Patil).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी