राजकीय

मुख्यमंत्र्यांना आषाढीची महापूजा करू देणार नाही!

मराठा आरक्षणासाठी पंढरपुरात मराठा समाज आक्रमक झाला असून, आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शनिवारी दहन करून शिंदे आणि फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून मुख्यमंर्त्यांना यंदाची आषाढीची महापूजा करू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. राज्य शासनातर्फे जून 2021 मध्ये मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली होती.

मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने मराठा समाजाला धक्का बसला आहे. राज्यभर तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे. पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शनिवारी मराठा समाज व मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संदीप मांडवे, स्वागत कदम, धनाजी मोरे, आकाष पवार, नीलेश गंगथडे, अॅड. राजेश भादुले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी मराठा समाज राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड म्हणाले की, मागील सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणासाठी आश्वासन दिले होते. सत्ता आल्यानंतर सहा महिन्यांत आरक्षण न दिल्यास राजकीय संन्यास घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. आम्हाला जेलमध्ये टाका किंवा गोळ्या घाला. जोपर्यंत मराठा समाजास आरक्षण देणार नाही, तोवर आषाढी यात्रेची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांना करू देणार नाही, असा इशाराही गायकवाड यांनी दिला.

मराठा समाजाच्या निर्णयात कमी पडले
मराठा आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर आता विरोधकही आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मराठा आरक्षणावरून सरकारवर टीका केली आहे. राऊत म्हणाले, सध्याचे उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते असताना आम्हाला सत्तेत येऊ द्या 2 दिवसात मराठा आरक्षण देतो असे म्हणत होते. आम्ही वाट पाहतोय. धनगर, मराठा समाज वाट पाहत आहेत. आता 9 महिन्यांपासून तुमच्याकडे सत्ता आहे. धनुष्यबाण काढून घेताना तत्परतेने निर्णय घेतला मात्र मराठा समाजाच्या निर्णयात कुठे कमी पडले.

हे सुद्धा वाचा: 

एकनाथ शिंदेंना तरुणाने सुनावले, तुम्ही एकतर छत्रपतींचे होऊ शकता किंवा सावरकरांचे!

मुंबई हायकोर्टाने धरले शिंदे-फडणवीस सरकारचे कान; ‘या’ कारणामुळे आमदार निधी वाटपाला स्थगिती

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या पायात घातला कोलदांडा

CM Eknath Shinde, Ashadhi Mahapuja, Maratha community, Pandharpur, CM Eknath Shinde does not allow Ashadhi Mahapuja; Maratha community aggressive in Pandharpur

Team Lay Bhari

Recent Posts

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

15 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

16 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

16 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

17 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

19 hours ago

Prithviraj Chavan Vs Atul Bhosle | सरकारने काळजी घेतली तर तरूण मुलंही म्हशी पाळतील

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(If the…

19 hours ago