राजकीय

राहुल गांधींनी पुन्हा दांडपट्टा फिरवला !

संसदीय अधिवेशनात  सुरुवातीला राहुल गांधी यांनी अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात किती ‘मधुर’ संबंध आहेत, याची पोलखोल केली होती. मित्राला वाचवण्यासाठी ते कशी धडपड करतात, याची सविस्तर माहिती संसदेच्या पटलावर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे संसदेत मोठा गोंधळ निर्माण झाला होता, असे असताना मुंबईमध्ये सध्या इंडिया आघाडीची बैठक सुरू होण्यापूर्वी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रान उठवायला सुरुवात केली. राहुल गांधींनी पुन्हा दांडपट्टा फिरवला असून मुंबई मुक्कामी ते उद्या माध्यम प्रतिनिधीबरोबर बोलताना काय नवीन बॉम्ब टाकतात याची उत्सुकता लागली आहे.

गौतम अदानीप्रकरणी राहुल गांधी यांनी पुन्हा  थेट मोदी यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीत चीनी व्यक्तीची गुंतवणूक आहे, त्याची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. अदानी यांच्या कंपनीच्या माध्यमातून 1 अब्ज डॉलर्स हे भारताबाहेर गेले आणि नंतर पुन्हा अदानी यांच्या कंपनीत गुंतवण्यात आले असाही आरोप त्यांनी केला.

अदानी यांच्या कंपनीत काही लोकांनी छुपी गुंतवणूक केली आहे. जवळपास 1 अब्ज डॉलर्स हे अदानी यांच्या कंपनीच्या माध्यमातून बाहेर वेगवेगळ्या देशात गेले आणि नंतर ते परत आले. त्या पैशातूनच आता अदानी हे विमानतळ आणि इतर प्रकल्प राबवत आहेत. हा पैसा कुणाचा आहे? अदानींचा आहे की आणखी कुणाचा? दुसऱ्या कुणाचा असेल तर ते कोण आहेत याची चौकशी करावी. विनोद अदानी हे या मागचे मास्टरमाईंड असून ते गौतम अदानी यांचे बंधू आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, अदानी यांच्या कंपनीमध्ये नासर अली शाबान अहली आणि चांग चुंग-लिंग यांची गुतंवणूक आहे. अदानी जर भारतात विकास प्रकल्प राबवतात तर त्यांच्या कंपनीमध्ये चीनी व्यक्तीचा पैसा कसा? अदानींची कंपनी ही संरक्षण क्षेत्रात काम करत आहे, मग चीनी व्यक्तीची गुंवतणूक त्यामध्ये कशी काय? गौतम अदानी यांच्या कंपनीमध्ये दोन व्यक्तींची गुंतवणूक असून ती का आहे याची चौकशी केली पाहिजे.
हे सुद्धा वाचा
एअर होस्टेसने असे केले इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचे स्वागत; व्हिडीओ व्हायरल !
अदानी यांच्या गुंतवणुकीतला पैसा कुणाचा? राहुल गांधी यांचा मोदींना थेट सवाल
बदला घेण्यासाठी मी शाहरुख सोबत काम केलं, ‘जवान’ मधील या कलाकाराचा गौप्यस्फोट

अदानी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. तसेच ईडी, सीबीआय हे अदानी यांची चौकशी का करत नाहीत असा सवालही त्यांनी केला. हिंडनबर्ग नंतर आता OCCRP या अमेरिकन संस्थेने भारतातील अदानी ग्रुपला पुन्हा लक्ष्य केलं आहे. अदानी समुहाने आपल्याच शेअर्समध्ये मॉरिशस कनेक्शन वापरुन अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करुन कृत्रिमरित्या आपल्या शेअर्सचे भाव वाढवल्याचा ओसीसीआरपीचा आरोप आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत केंद्राला कशा पद्धतीने कोंडीत पकडायचे याची चर्चा होईल, पण त्यापूर्वीच राहुल गांधी यांनी मोठा बॉम्ब भाजपच्या दिशेने भिरकावला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राहुल गांधी आणि मोदी यांच्यात शाब्दिक युद्ध रंगण्याची चर्चा आहे. अदानी प्रकरणावर  विरोधकांनी संसदीय संयुक्त चिकित्सा समितीमार्फत चौकशीची मागणी केली होती. पण ती मान्य करण्यात आली नाही.

विवेक कांबळे

Recent Posts

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

3 mins ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

40 mins ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

1 hour ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

2 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

2 hours ago

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

4 hours ago