राजकीय

‘वडील मजुरी करतात, अमेरिकेतील शिक्षणाचा विचारही केला नव्हता’

टीम लय भारी

मुंबई: सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिल जाणारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा  75 विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या गतिशील निर्णयामुळे यावर्षाची योजना धडाक्यात मार्गी लागली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वसामान्य कूटुंबातील विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलणार आहे. माझे वडील मजुरी करतात, कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अमेरिकेत शिक्षणासाठी जाईल, असे म्हणत एका आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत (Dhananjay Munde dynamic decision change life ordinary families student’s).

भंडारा येथे राहणाऱ्या शिवानी वालेकर हिचे वडिल हे मजुरी करतात. पण शिवानी आता अमेरिकेत शिक्षणासाठी जाणार आहे. लंडन येथील (The University of Edinburgh) मध्ये मॅन्युअल स्कॅवेंजिंग (Manual Scavaenging) याविषयाचे  संशोधन करण्यासाठी शिवानीची निवड झाली आहे. माझे वडील मजुरी करतात, कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अमेरिकेत शिक्षणासाठी जाईल. आज ते समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेमुळे आणि तेही इतक्या लवकर प्रक्रिया होऊन शक्य झाले आहे, यावर विश्वासच बसत नाही. सामाजिक न्याय मंत्री धनु भाऊ यांनी ही प्रक्रिया पारदर्शक व जलद गतीने राबवली, त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत, अशी भावुक प्रतिक्रिया शिवानी वालेकर हिने व्यक्त केली आहे. शिवानी सारख्या एक नाही तर अनेक विषयात प्राविण्य मिळविलेले सर्वसामान्य कूटुंबातील विद्यार्थ्यांनी आपल्या भावना समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत.

सफाईगाराची मुलगी, धुणी भांडी करणाऱ्या महिलेचा मुलगा जाणार परदेशी शिक्षणासाठी, धनंजय मुंडेंच्या निर्णयाचा फायदा

‘लय भारी’च्या कार्यालयाचा शुभारंभ; बाळासाहेब थोरात – धनंजय मुंडेंनी केले तोंड भरून कौतुक

नाशिकच्या चारुदत्त म्हसदे याची अमेरिकेच्या न्युयार्क विद्यापीठमध्ये मानवी शरिरातील विविध भागासाठी लागणाऱ्या उपकरणांचा शोध व त्यात सुधारणा या विषयावर संशोधनासाठी निवड झाली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एका खेडेगावात गाई-म्हशींचे पालन-पोषण करून शेण-मातीचे कामाबरोबरच मिळेलल ते काम केले. अदिवासी दुर्गम भागात राहत असल्याने पाण्यासाठी 1-2 किलोमीटर रोजची वणवण अशा परिस्थितीत कुटूंबाच्या उदर्निर्वाहासाठी प्रयत्न करत शिक्षण सोडले नाही. समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृतीच्या पुण्याई मुळेच वाडीव-हे (जिल्हा नाशिक) ते वॉशिंग्टन हा माझा प्रवास हा हजारो विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरल्यास जीवनाचे सार्थक होईल, अशी भावुक प्रतिक्रिया चारुदत्त म्हसदे यांनी व्यक्त केली आहे.

आयुक्तालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले होते

अमरावतीच्या भीमनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या विकास तातडची जगातील शिक्षण पद्धतीवर संशोधन करण्यासाठी निवड झाली आहे. विकासने वडिलांना चहा टपरी चालवण्यास मदत करुन शिक्षण पुर्ण केले. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेल्या लंडनच्या केंब्रिज विद्यापीठाच्या व बाबासाहेबांचे गुरु असलेले जॉन डुई हे संस्थापक असलेल्या टीचर्स कॉलेज येथे विकासची निवड झाली आहे. विकास तातड या विद्यार्थ्याचा प्रवास असा आहे की, सर्वांच्या डोळ्यात पाणी येईल.

धनंजय मुंडेंची लोकप्रियता शिगेला, मातब्बर नेत्यांच्या पंक्तीत समावेश, पंकजा मुंडेंनाही टाकले मागे

MoS Finance Bhagwat Karad kicks off Jan Ashirwad Yatra in Maharashtra from Munde’s home turf Beed

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2021-22 या वर्षात निवड झालेल्या 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली असुन त्यांची मुळ कागदपत्रे तपासणी व त्यांना अंतिम मंजुरी आदेश देण्याबाबत 20 ऑगस्टला आयुक्तालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता सुरु झालेला हा अनोखा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालू होता.

कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालु होता

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नामुळे या योजनेमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आल्याने प्रथमच या योजनेचा 100% कोटा पुर्ण होत आहे. त्यातूनच गेल्या दहा वर्षातील रेकॉर्डब्रेक कामगिरी या वर्षी झाली आहे. तसे बघितले तर देशात परदेश शिष्यवृत्ती योजनेबाबत विभागाची सर्वोत्तम कामगिरी झाली आहे. कारण अवघ्या काही दिवसांमध्ये जाहिरात प्रसिद्धी करणे पासून अर्ज स्वीकारणे, तपासणे, तुटीच्या अर्जाची पूर्तता करून घेणे, गृह चौकशी करणे, सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे. या सर्व बाबीचा विचार करता तसेच कोविडची परिस्थीती विचारात घेता विद्यार्थाच्या मागणी नुसार वेळोवेळी देण्यात आलेली मुदतवाढ, राज्यात व देशात कोरोनाचे संकट गंभीर, तरीही कमी दिवसाच्या कालावधीमध्ये व लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये विभागाने रात्रीचा दिवस करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करून अंतिम मजुंरी आदेश दिले आहे (Dhananjay Munde night and day students have been sanctioned scholarships and final wages have been ordered).

शासनाचे काम आणि चार हात लांब अशी जी म्हण प्रचलित आहे या म्हणीला छेद देण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले

देशातील विविध राज्यांमध्ये अशा पद्धतीने शिष्यवृत्ती दिली जात असली तरी सर्वांत आधी व तितक्याच वेगाने  राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने केलेली कामगिरी ही विद्यार्थ्यांना मोठा दिलासा असुन निश्चितच सुखवाह ठरली आहे. या कामागिरीमुळे विद्यार्थी देखील उत्साही झाले आहेत. दरवर्षी असंख्य विद्यार्थी परदेशात जात असले तरी त्यात सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थी प्रथमच शिष्यवृती योजनेमुळे जात असल्याने व इतरही बरिच प्रक्रिया करावी लागत असल्याने ते निश्चितच तणावात असतात. शासनाचे काम आणि चार हात लांब अशी जी म्हण प्रचलित आहे, या म्हणीला छेद देण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले आहे. यामेळे सर्वच विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत (Dhananjay Munde work All the students have expressed their gratitude for him).

Sagar Gaikwad

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

3 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

4 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

5 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

6 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

6 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

6 hours ago