28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयधनंजय मुंडेंची लोकप्रियता शिगेला, मातब्बर नेत्यांच्या पंक्तीत समावेश, पंकजा मुंडेंनाही टाकले मागे

धनंजय मुंडेंची लोकप्रियता शिगेला, मातब्बर नेत्यांच्या पंक्तीत समावेश, पंकजा मुंडेंनाही टाकले मागे

टीम लय भारी
मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे ह्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून सात लाख फॉलोवर्सचा टप्पा पूर्ण केला आहे (Twitter followers list of maharashtra’s politicians, dhananjay munde crossed 7 lacks followers on Twitter).

यानंतर ते राज्यातील दिग्गज नेत्यांच्या यादीमध्ये आले आहेत. तसेच त्यांच्या नेहमीच्या प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या ट्विटर हँडलरशी तुलना केल्यास धनंजय मुंडे जवळपास 80 हजारांनी पुढे आहेत! पंकजाताई मुंडे यांना 6.18 लाख लोक ट्विटरवर फॉलो करतात.

पोलिसांकडून झाली चूक, चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी

Twitter
ट्विटर फॉलोअर्स

गोपीचंद पडळकरांच्या भेटी गाठी, माता – भगिनींनी केले स्वागत !

राज्यात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक 49 लाख लोक ट्विटरवर फॉलो करतात तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या ट्विटर खात्याला 23 लाखांच्या वर फॉलोवर्स आहेत. सुप्रियाताई सुळे 13 लाख तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना 10 लाख लोक ट्विटरवर फॉलो करतात!

राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर खात्याला जवळपास साडेआठ लाख फॉलोवर्स आहेत. त्याखालोखाल या यादीत आता 7 लाखांचा टप्पा पूर्ण केलेले धनंजय मुंडे देखील सामील झाले आहेत.

‘बचपन का प्यार’ फेम मुलाची अभिनेत्यांना ही भूरळ; रेकॉर्डिंगसाठी लागली लाईन

Cong claims Rahul’s Twitter account temporarily suspended, Twitter denies; party says it is ‘locked’

या व्यतिरिक्त शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8.39 लाख तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना 2.5 लाख, आ. रोहित पवार यांना 3.90 लाख लोक फॉलो करतात.

महाराष्ट्रात तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले व आपल्या वक्तृत्व कौशल्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे धनंजय मुंडे यांचा राज्यभरात चाहता वर्ग असून त्याची संख्या खूप मोठी आहे. ट्विटर वरील फॉलोवर्सच्या संख्येच्या माध्यमातून राज्यातील दिग्गज नेत्यांच्या यादीत आलेले धनंजय मुंडे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील भविष्य हे नक्कीच उज्वल व दीर्घकालीन असणार आहे, हे काळ्या दगडावरची रेघ आहे.

राज्यातील आघाडीच्या पक्षांतील काही लोकप्रिय असणारे नेते व त्यांचे ट्विटर फॉलोअर्सवर

  • राष्ट्रवादी काँग्रेस नेते

शरद पवार 2.3M
अजित पवार 1 M
सुप्रिया सुळे 1.3M
जयंत पाटील 439K
दिलीप वळसे 95.5K
सुनील तटकरे 145K
हसन मुश्रीफ 103K
नवाब मलिक 215 K
प्रफुल्ल पटेल 138 K
धनंजय मुंडे 700K
रोहित पवार 390K

  • शिवसेना नेते

उध्दव ठाकरे 858 K
आदित्य ठाकरे 3 M
एकनाथ शिंदे 169 K
सुभाष देसाई 92.8K
संजय राऊत 839K

  • काँग्रेस नेते

बाळासाहेब थोरात 250K
नितीन राऊत 135K
नाना पटोले 171K
विश्वजित कदम 54.9K
सतेज पाटील 61 K
अमित देशमुख 152 K
अशोक चव्हाण 301 K
पृथ्वीराज चव्हाण 242 K

  • भाजप नेते

देवेंद्र फडणवीस. 4.9M
पंकजा मुंडे. 618K
चंद्रकांत पाटील. 186K
सुधीर मुनगंटीवार. 223K
आशिष शेलार. 243K
रावसाहेब दानवे 150K
प्रीतम मुंडे 94K

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी