29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूज'लय भारी'च्या कार्यालयाचा शुभारंभ; बाळासाहेब थोरात - धनंजय मुंडेंनी केले तोंड भरून...

‘लय भारी’च्या कार्यालयाचा शुभारंभ; बाळासाहेब थोरात – धनंजय मुंडेंनी केले तोंड भरून कौतुक

टीम लय भारी

मुंबई : ‘लय भारी’च्या कार्यालयाचे गुरूवारी उदघाटन झाले. राज्याचे महसूल मंत्री आणि बाळासाहेब थोरात व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी ‘लय भारी’चे कौतुक केले (Lay Bhari office inaugrated by Balasaheb Thorat and Dhananjay Munde).

‘लय भारी’ लवकरच महाराष्ट्रातील जिल्हानिहाय ऑनलाईन आवृत्या प्रकाशित करेल असा विश्वास यावेळी बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. थोरात यांनी ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात यांचे तोंड भरून कौतुक केले. तुषार खरात शैक्षणिक बिट सांभाळत होते तेव्हापासून त्यांच्या बातम्या कशा वेगळ्या असत याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. ते पुढे म्हणाले की, भविष्यात ‘लय भारी’ आपल्या नावाचा दबदबा महाराष्ट्रात तयार करेल. वृत्तपत्रांच्या जिल्हानिहाय आवृत्ती असतात. ‘लय भारी’च्याही तशाच ऑनलाईन जिल्हावार आवृत्ती निघाव्यात. ‘लय भारी’चा देशात दबदबा तयार व्हावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. पूर्वी ‘लय भारी’ म्हटले की, हातात वीट घेतलेला रितेश देशमुख आठवायचा. आता मात्र ‘लय भारी’चे पोर्टल नजरेसमोर येते, असे मिश्लीक शब्दांत त्यांनी सांगितले.

‘सुप्रिया सुळेंचा संसदेत टाईमपास’

बाळासाहेब ठाकरेंचे इंदिरा गांधींना पत्र, पहाटे ४.३० वाजता शिवसेना प्रमुखांना झाली होती अटक

संपादक तुषार खरात हे आमच्यासारखेच गावातून येऊन मुंबईत पाय रोवून उभे राहिले आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यातून येऊन मुंबईत स्थायिक होऊन फोर्टसारख्या मध्यवर्ती ठिकाणी ऑफिस सुरु करणे सोपे नाही. त्यांनी पत्रकारिता करण्यास सुरुवात केली. त्या वेळेपासूनच त्यांच्या बातम्यांमधील वेगळेपण दिसत होते, असे थोरात म्हणाले.

inauguration
‘लय भारी’ भविष्यात महाराष्ट्रात दबदबा तयार करेल : बाळासाहेब थोरात

धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात वेब पोर्टलचे वेगळेपण आणि ‘लय भारी’चा महाराष्ट्रात दबदबा का आहे याचे कारण सांगितले. ‘लय भारी’ कशाचीही भीड न बाळगता बातम्यांच्याही मागे दडलेल्या बातम्या लोकांसमोर आणते. त्याच बरोबर प्रत्येकाच्या मनात खदखदत असलेले विषय प्रकाशात आणून प्रशासनासमोर आणि जनतेसमोर मांडले. या कारणामुळेच ‘लय भारी’ने कमी कालावधीत लोकांची विश्वासार्हता संपादन केल्याचे ते म्हणाले.

टाइप न करता व्हॉट्सअँपवरून पाठवू शकता मेसेज

No decision yet on reducing stamp duty again: Balasaheb Thorat

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी